Onion Saam tv
ऍग्रो वन

दोन एकरातील कांदा पिकावर फिरविला नांगर; शेतकरी हवालदील

दोन एकरातील कांदा पिकावर फिरविला नांगर; शेतकरी हवालदील

संजय महाजन

यावल (जळगाव) : दहिगाव (ता. यावल) येथून जवळच असलेल्या विरावली येथील शेतकऱ्याने दोन एकरमध्‍ये कांदा पिकाची लागवड केली होती. कमी उत्पादन तसेच भाव घसरल्याने या दोन एकर शेतीवर नागरटी करून कांदा फेकला. कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी (Farmer) हवालदिल झाला असून त्याच्या डोळ्यात पाणी येत आहे. (jalgaon news Plow rotated on two acre onion crop)

विरावली– दहेगाव रस्त्यालगत विरावली शिवारात निळकंठ सदाशिव पाटील या शेतकऱ्याने कांदा (Onion) लागवड केलेले दोन एकर शेत आहे. कांद्याचे उत्पादन कमी होत असल्याने तसेच कांद्याचे भाव घसरल्याने दोन एकर कांद्याच्या शेतीवर नागर फिरवला व ढसाढसा रडला. सर्व सामान्य शेतकरी भाव घसरल्‍यो (Jalgaon News) वैतागला आहे. घेतलेले कर्ज यात फिटू शकत नाही. एक एकर शेतीला 35 ते 40 हजार रुपये रोप खरेदीपासून तर खांदणीपर्यंत खर्च येतो. तो सुद्धा यात येऊ शकत नसल्याने शेतकरी वैतागला आहे.

आता कर्ज फेडीची प्रश्‍न

सध्या कांद्याचा भाव दोनशे ते अडीचशे रुपयेपर्यंत आहे. एवढा कमी भाव शेतकऱ्याला परवडत नसल्याने शेवटी दोन एकर शेतीवर नागर फिरून कांदा फेकून दिला. या प्रकाराने कांदा उत्पादक वैतागले आहेत सावकाराचे व संस्थांचे घेतलेले कर्ज फेडायचे कसे हा प्रश्न मात्र शेतकऱ्यांपुढे पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नमाज पठाणावरुन शनिवारवाड्यात आंदोलन

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Raigad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई; पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदोलन

Diwali Bad Impact: दिवाळीत 'या' 5 चुका मुळीच करू नका, भोगावे लागतील मोठे परिणाम

IND Vs AUS : रोहित-विराटचा कमबॅक फसला, गिल-अय्यरही फ्लॉप; ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहज विजय

SCROLL FOR NEXT