Jalgaon Farmer News
Jalgaon Farmer News Saam tv
ऍग्रो वन

Jagaon: नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर (जळगाव) : सालबर्डी (ता. मुक्ताईनगर) येथील एका तरुण शेतकऱ्याने सततच्या नापिकीमुळे शेतातच विषप्राशन केले. दरम्यान, शुक्रवारी (ता. २८) मध्यरात्री उपचार सुरू असताना या शेतकऱ्याचा (Death) मृत्यू झाला. (Maharashtra News)

सालबर्डी (Jalgaon) येथील ललित संजय झोपे (वय ३१) यांची साडेतीन एकर शेती आहे. सततची नापिकी व शेती पिकांवर उद्भवणारे नैसर्गिक आपत्तीचे संकट यातून आर्थिक परिस्थिती अधिकच खालावली. अखेर आर्थिक नुकसानीला कंटाळून या तरुण शेतकऱ्याने (Farmer) शेतात विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना उघडकीस आली.

उपचारादरम्‍यान मृत्‍यू

प्रकृती प्रचंड खालावल्याने उपचारार्थ जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी (ता २८) मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या मयत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले असा परिवार असल्याने घरातील कुटुंब प्रमुख हरविल्याने झोपे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी भाजपचं आंदोलन

RR-KKR चा सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला तर? कोणाचं होणार नुकसान?

Sangli News: पैज लावाल तर तुरुंगात जाल! निकालावरुन पैज लावणं अंगलट आलं, सांगलीत दोन मित्रांच्या गाड्याही जप्त

Anti Diet Plan म्हणजे काय? कोणासाठी आहे फायदेशीर

Special Report | शिंदेंना भाजपचा मुख्यमंत्री म्हणून विरोध! राऊतांच्या दाव्याने राजकीय भूकंप येणार?

SCROLL FOR NEXT