ऍग्रो वन

डाळिंबाचे विक्रमी उत्‍पादन; सात एकरात पन्‍नास लाखाचे उत्‍पन्‍न

डाळिंबाचे विक्रमी उत्‍पादन; सात एकरात पन्‍नास लाखाचे उत्‍पन्‍न

संजय महाजन

जळगाव : कोरोनामुळे लागलेल्‍या लॉकडाउनमुळ अनेकांचे बजेट कोलमडले आहे. यातून शेतकरी देखील सुटलेला नाही. यातच पावसाची अनियमितेमुळे शेतकरीपुढे उत्‍पादनाचे आव्‍हानच आहे. मात्र तालखेडा (ता.मुक्ताईनगर) येथील शेतकरी बांधवांनी डाळिंबाची लागवड केल्‍यानंतर काढलेले उत्‍पादन हे विक्रमी ठरले आहे. सात एकरातून पन्‍नास लाखाचे उत्‍पन्‍न काढले आहे. (jalgaon-news-farmer-Record-production-of-pomegranate-farming)

तालखेडा (ता. मुक्‍ताईनगर) येथील नवनीत पाटील व दिलीप पाटील हे दोन्‍ही बंधू असून त्‍यांनी एकत्रित शेती करून हे विक्रमी उत्‍पादन घेतले आहे. पाटील बंधूचे सहकुटुंब शेतात राबते. इतकेच नव्‍हे, तर त्‍यांच्‍या शेतात रोज किमान चाळीस मजुर कामाला असतात.

२०१४ मध्‍ये लागवड

पाटील बंधूंनी भगवा जातीचे डाळिंबाची लागवड २०१४ मध्‍ये केली. पिकाची चांगली निगा राखत त्‍यांनी गतवर्षापासून उत्‍पादन काढण्यास सुरवात केली. यात मागील वर्षभरात ९०० क्‍वींटन डाळींबाच उत्‍पादन काढत ५० लाखाचे उत्‍पन्‍न काढले. विशेष म्‍हणजे पुढील पंधरा वर्ष डाळींबाचे उत्‍पन्‍न काढले जाणार आहे.

बांग्‍लादेशात निर्यात

मुक्ताईनगर तालुक्यातील डाळिंब आता पंढरपूर येथील व्यापारींनी ५२०० रूपये दराने खरेदी केले. या माध्यमातून हे डाळिंब बांगलादेशात निर्यात केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. फळ बागायतीकडे वळल्यामुळे हलाखीच्या परिस्थितीवर मात करत शंभर एकरापर्यंत ही शेतकरी आता पोहोचले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पब्लिक ट्रान्सपोर्टमधला जबरदस्त चमत्कार! एकाच स्टेशनवर थांबणार मोनो, मेट्रो आणि मुंबई लोकल

Chanakya Niti: ही ५ ठिकाणं, तिथं कंजूषपणे वागा; कधीच होणार नाही पाकीट रिकामं, बँक बॅलन्स तर कडकच!

Maharashtra News Live Update: धावत्या दुचाकीनं घेतलं पेट, गाडी चालक जखमी; येवल्यातील घटना

डायबिटीजच्या रूग्णांसाठी धोक्याची घंटा! 'या' 5 वाईट सवयींमुळे वाढू शकते रक्तातील साखर

Accident News: सात जन्मांच्या शपथा काही तासांतच तुटल्या! हनिमूनसाठी उड्डाण, पण परतलाच नाही; पत्नीसमोरच पतीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT