Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News: शेतात जावून शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

शेतात जावून शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : धानवड (ता. जळगाव) येथील ४० वर्षीय शेतकऱ्याने (Farmer) शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याबाबत एमआयडीसी पोलिस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भरत युवराज पाटील (४०, रा. धानवड, ता. जि. जळगाव) असे शेतकऱ्याचे नाव आहे. (Live Marathi News)

धानवड येथील भरत पाटील हे परिवारासह शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. बुधवारी (१ फेब्रुवारी) ते शेतात गेले होते. शेतातील निंबाच्या झाडाला त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार शेजारील शेतकऱ्याच्या लक्षात आल्याने त्यांनी गावातील ग्रामस्थांना माहिती दिली.

परिवाराचा आक्रोश

ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी धाव घेत मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. रूग्णालयात लहान भाऊ आणि बहिणीने एकच आक्रोश केला होता. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मृत भरत यांच्यामागे आई देवकाबाई, पत्नी ललिता, लहान भाऊ राजेंद्र, विवाहित बहिण, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

कन्नड नगरपरिषदेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना; थरारक VIDEO

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

SCROLL FOR NEXT