Jamner News Saam tv
ऍग्रो वन

Jamner News : शेतीतून उत्पन्न नाही, दूध व्यवसायात नुकसान; विवंचनेतून शेतकऱ्याने संपविले जीवन

Jalgaon News : काही वर्षांपासून ते सतत आर्थिक विवंचनेत होते. शेतीतून चांगले ऊत्पादन येत नसल्याने त्याला जोड व्यवसाय म्हणून त्यांनी म्हैस विकत घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला

Rajesh Sonwane

जामनेर  (जळगाव) : कर्जाचा वाढत जाणारा डोंगर आणि पशुपालन व्यवसायात झालेले आर्थिक नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. याचा विवंचनेत तरुण अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातच झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपविले. हि हृदयद्रावक घटना लोंढरी बुद्रुक (ता. जामनेर) येथे घडली.

जामनेर (Jamner News) तालुक्यातील लोंढरी बु. येथील जीवन ज्ञानेश्वर भागवत (वय ३८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते सतत आर्थिक विवंचनेत होते. शेतीतून चांगले ऊत्पादन येत नसल्याने त्याला जोड व्यवसाय म्हणून त्यांनी म्हैस विकत घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र यातही त्यांना यश आले नाही. सततच्या नुकसानीने कर्ज फेडता येत नसल्याने त्यांनी अखेर (Farmer) शेतातच लिंबाच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपविली.

पहूर ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी बाराला अंत्यसंस्कार करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांच्या खबरीवरून पहूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल पाटील करीत आहेत. त्यांच्या पश्च्यात वृद्ध आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी व वहिनी असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नंदुरबार मतदारसंघातून विजयकुमार गावित होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: हातकणंगलेमधून काँग्रेसचे राजू आवळे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : राम शिंदे पराभवाचा वचपा काढणार की रोहित पवार पुन्हा आमदार होणार? एक्झिट पोल काय सांगतो?

Samosa Recipe: नाश्त्यासाठी १० मिनिटांत बनवा हॉटेलसारखा खुसखुशीत समोसा

IND vs AUS: पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियामध्ये मोठा फेरबदल, अचानक 'या' खेळाडूची संघात एन्ट्री!

SCROLL FOR NEXT