Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News: शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

साम टिव्ही ब्युरो

कासोदा (जळगाव) : एरंडोल (Erandol) येथून जवळच असलेल्‍या आडगाव येथील एका शेतकऱ्याने शेतात विष घेऊन आत्महत्या केली. राजेंद्र भगवान पाटील (वय ५५) असे शेतकऱ्याचे (Farmer) नाव आहे. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. (Tajya Batmya)

राजेंद्र पाटील हे २० डिसेंबरला सकाळी साडेआठच्या सुमारास नेहमीप्रमाणे बैलांना चारापाणी करण्यासाठी शेतात गेले होते. तिथे त्यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यांच्या शेताला लागून त्यांचा पुतण्या शेतात पाणी भरत होता. त्याला काका राजेंद्र पाटील हे जमिनीवर झोपलेले दिसले. ते का झोपले, हे पाहण्यासाठी गेला असता त्यांच्याजवळ काहीतरी विषारी बाटली पडलेली दिसली. त्यांच्या तोंडाचा विषारी औषध घेतल्याचा वास येत होता.

ताबडतोब घरी राजेंद्र पाटील यांच्या मुलाला व इतर लोकांना कळवले. त्यांना उपचारार्थ प्राथमिक आरोग्य केंद्र कासोदा येथे घेऊन गेले असता तेथे डॉक्टरांनी तपासल्यावर त्यांना मृत घोषित केले. त्यांचे शवविच्छेदन एरंडोल ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. कासोदा पोलिस ठाण्यात सुभाष भगवान पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून नोंद करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी युवराज कोळी तपास करत आहेत. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, सून असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhimashankar Temple: त्र्यंबकेश्वरनंतर भिमाशंकर मंदिरातही गळती, पहिल्या श्रावणी सोमवारमुळे मोठी गर्दी; भाविकांचे हाल, पाहा VIDEO

Rutuja Bagwe : ऋतुजा बागवेची नवी इनिंग! सुरू केलं स्वत:चं रेस्टॉरंट, लोकेशन काय?

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Smartphone Care: पावसात फोन भिजला? घाबरू नका, 'या' टिप्सने तुम्ही फोन पुन्हा चालू करू शकता

Ladki Bahin Yojana: लाडकीसाठी सर्वात मोठी बातमी! राज्यातील तब्बल ५० लाख महिलांचा लाभ कायमचा बंद, कारणही आले समोर

SCROLL FOR NEXT