Banana Price Saam tv
ऍग्रो वन

Banana Price: केळीला मिळतोय उच्‍चांकी दर; आवक कमी

केळीला मिळतोय उच्‍चांकी दर; आवक कमी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : केळी बाजारभावाचा आलेख गेल्‍या महिनाभरापासून दररोज उंचावत आहे. यामुळे केळी उत्‍पादक शेतकरीला (Farmer) चांगला दर मिळत आहे. गुणात्मक दर्जाच्या केळी (Banana) मालाला २ हजार ८०० ते ३ हजार रुपये बाजारभाव प्राप्त होत आहे. (Live Marathi News)

रावेर बाजार समितीच्या केळी भावापेक्षा २०० ते ३०० रुपये जास्त भाव अदा करून केळी मालाची खरेदी सुरू आहे. पाच- सहा वर्षांपासून हिवाळ्यात केळी बाजारभावाची होणारी पडझड; या सर्वांमुळे कांदेबाग व पिलबाग केळीची गतवर्षी अपेक्षीत लागवड झाली नाही. यामुळे केळीची आवक कमी आहे.

गतवर्षी मार्च महिन्यात वाढलेला सनस्ट्रोक पाहता व मे-जूनमध्ये उतीसंवर्धित रोपांच्या उशिरा झालेल्या उपलब्धतेमुळे यंदा रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा व बऱ्हाणपूर जिल्ह्यासह आंध्रप्रदेश, गुजरात, नांदेड व सोलापूर भागातही केळीमालाची उपलब्धता नाही.

दररोज रावेर तालुक्यातून निघणाऱ्या १५ ते २० ट्रक केळी मालाचे भाव वाढले आहेत. रावेर बाजार समितीच्या केळी बाजारभावात १ हजार ४४५ रुपयांपासून दररोज ४० ते ८० रुपये यादरम्यान दर वधारत आहेत. आज २४०० रुपये प्रतिक्विंटल भाव घोषित करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT