Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price: जिनिंग उद्योग संकटात; कापसाची आवक नसल्याचा परिणाम

जिनिंग उद्योग संकटात; कापसाची आवक नसल्याचा परिणाम

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : गतवर्षीप्रमाणे यंदा देखील जानेवारी– फेब्रुवारीमध्‍ये कापसाचे दर वाढतील अशी आशा (Farmer) शेतकरींमध्‍ये अजूनही आहे. यामुळे कापूस विक्रीसाठी आणत नसल्याचे चित्र सध्‍या सर्वत्र पहावयास मिळत आहे. यामुळे कापसाची आवक कमी झाल्‍याचा फटका जिनिंग उद्योगाला बसत आहे. यामुळे आता कापसाचे दर (Cotton Price) कधी वाढतील व जिनिंग सुरू होतील; याची प्रतिक्षा सर्वत्र आहे. (Tajya Batmya)

गेल्यावर्षी कापसाला चांगला भाव भेटल्याने जानेवारी अखेरपर्यंत जळगाव जिल्ह्यातील ९० टक्के शेतकऱ्यांनी आपला माल विक्री केला होता. यंदा देखील कापसाला चांगला दर मिळेल; अशी अपेक्षा बळीराजाला होती. परंतु, अद्यापपर्यंत चांगला दर मिळालेला नाही. यामुळे शेतकरी देखील विवंचनेत अडकला आहे.

शंभर जिनिंगमध्‍ये आवकच नाही

यंदा हंगाम सुरु झाल्यापासूनच कापसाचे दर गेल्यावर्षाच्या तुलनेने कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अद्याप माल बाजारात आणला नाही. खान्देशात आतापर्यंत केवळ ४ लाख गाठींची खरेदी झाली आहे. खानदेशातील १५० पैकी केवळ ५० जिनिंग सध्या सुरू आहेत. तर १०० जिनिंगमध्ये कापसाची आवकच नाही. यामुळे या जिनिंगमध्ये काम करणाऱ्या १० हजार मजुरांचा रोजगार गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Doctor Attack: डॉक्टर रुग्णाला समजावत होते, मुलगा संतापला; केबिनमध्ये घुसून डॉक्टरला मारहाण

Famous Actress Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली; फुफ्फुसांच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी

Alibaug Fort : समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला ३०० वर्षांचा भव्य किल्ला! अलिबागला गेल्यावर 'हे' सिक्रेट ठिकाण नक्की पाहा

Easy Banana Cake Recipe : पिकलेल्या केळीपासून बनवा झटपट टेस्टी चॉकलेटी केक

2029 ला प्रयत्न करा, भाजपच्या दिग्गज नेत्याची विजय वडेट्टीवार यांना पक्षात येण्याची ऑफर; भर सभेत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT