Jalgaon Farmer News Saam tv
ऍग्रो वन

नापिकी अन्‌ कर्जाचा बोजा; शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

नापिकी अन्‌ कर्जाचा बोजा; शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

साम टिव्ही ब्युरो

एरंडोल (जळगाव) : सततची नापिकीमुळे खासगी सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे? या आर्थिक विवंचनेत असलेले (Erandol) कासोदा दरवाजा परिसरातील वयोवृद्ध शेतकरी (farmer) नीळकंठ महादू खैरनार (वय ७४) यांनी रविवारी (ता. ६) दुपारी दीडच्या सुमारास शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. (Breaking Marathi News)

नीळकंठ खैरनार हे सततच्या नापिकीला कंटाळून अनेक (Jalgaon) दिवसांपासून चिंताग्रस्त होते. त्यांनी खासगी सावकाराकडून देखील कर्ज घेतले होते. पिकांच्या नुकसानीमुळे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत ते होते. त्यांचा मुलगा विनोद खैरनार (Surat) सुरतला असतो, दिवाळीनिमित्त तो एरंडोल येथे वडिलांकडे आला आहे. दीडच्या सुमारास विनोद खैरनार घरी असताना धीरज भोई यांनी नीळकंठ खैरनार यांनी पंकज कांबरे यांच्या शेतात झाडाला गळफास घेतला असल्याचे सांगितले.

विनोद खैरनार यांनी धीरज भोई, गोपाल पाटील, धनराज गुजर, बाळा वंजारी यांच्यासह शेताकडे धाव घेतली असता नीळकंठ खैरनार हे झाडाला गळफास घेऊन लटकलेले दिसले. शरद खैरनार यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील लोहार, अनिल पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समुद्रात भयंकर दुर्घटना! २४० प्रवाशांनी भरलेले जहाजच गायब; बचावकार्य सुरू

Gold Rate Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदीही झाली स्वस्त, वाचा 24, 22 आणि १८ कॅरटचे आठवडाभराचे दर

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

Konkan Travel : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या नागरिकांचे हाल, रेल्वे १२ तास उशिराने, महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा

हार्ट हेल्थसाठी पुरुषांनी रोज किती चालावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT