Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News: बनावट बियाण्याची ९५ पाकिटे जप्त; कृषी विभागाची कारवाई

बनावट बियाण्याची ९५ पाकिटे जप्त; कृषी विभागाची कारवाई

साम टिव्ही ब्युरो

चोपडा (जळगाव) : खरीप हंगामाला अद्याप सुरवात झालेली नाही. शिवाय मान्‍सुनपुर्व कापूस लागवड देखील अद्याप सुरू झालेली नाही. अशात बियाणे विक्रीला अजून (Agriculture Department) कृषी विभागाकडून परवानगी नाही. यापुर्वीच (Cotton) कापसाचे बनावट बियाणे विक्री समोर आली आहे. चोपडा येथे जळगाव कृषी विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चोपडा शहरा बाहेरील पेट्रोलपंपाच्या बाजूला हॉटेल ‘न्यू सुनीता’मध्ये तपासणी केली असता रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी (Farmer) संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप आधार पाटील (रा. वर्डी, ता. चोपडा) यांनी ठेवलेले बनावट अंकुर सीड्स कंपनीची स्वदेशी ५ संकर देशी कापूस बियाणे असलेले ९९ हजार ७५० रुपये किमतीची ९५ सीलबंद पाकिटे आढळून आली. ही कारवाई मंगळवारी (२३ मे) मध्यरात्री करण्यात आली.

गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांना शहराबाहेर (Chopda) चोपडा-धरणगाव रस्त्यावर असलेल्या हॉटेल न्यू सुनीतामध्ये बनावट बियाणे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून शहर पोलिसांच्या (Police) मदतीने हॉटेलमध्ये जाऊन चौकशी केली असता वर्डी येथील संदीप आधार पाटील यांनी गाडी खराब झाली म्हणून दोन प्लास्टिकच्या पिशव्या ठेऊन गेल्याची माहिती हॉटेलचे व्यवस्थापक अमोल राजपूत यांनी सांगितले. त्या पिशव्यांची तपासणी केली असता त्यात बनावट अंकुर सीड्स कंपनीचे स्वदेशी- ५ संकर देशी कापूस बियाणे असलेली ९९ हजार ७५० रुपये किमतीची ९५ सीलबंद पाकिटे आढळून आली. त्यावरून अरुण तायडे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिसांत शेतकरी संघटनेचे संदीप पाटील यांच्याविरोधात शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित संदीप आधार पाटील यांना चोपडा शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी संतोष चव्हाण यांनी ताब्यात घेतले असून, वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. दरम्यान, संदीप पाटील यांना आज (२५ मे) न्यायालयात हजर केले जाणार असून, अजूनही बोगस बियाण्याच्या रॅकेटमध्ये कोण आरोपी आहेत, त्यांचा शोध घेण्यात येईल, असे तपास अधिकारी संतोष चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Maharashtra News Live Update: चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; युवती जखमी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

Thumb sucking in children: लहान बाळांची अंगठा चोखण्याची सवय कशी मोडाल?

SCROLL FOR NEXT