Jamner News Saam tv
ऍग्रो वन

Jamner News : शेतात कामासाठी जाताना विद्युत तारांना स्पर्श होऊन शेतकऱ्याचा मृत्यू

Jalgaon News : पावसाने थोडी उघडीप दिल्याने शेती कामांना वेग आला आहे. शेतात लागवड केलेल्या कापूस, मका, उडीद, मूग पिकांची कोळपणी केली जात आहे.

Rajesh Sonwane

जामनेर (जळगाव) : शेतात सध्या पीक कोळपणीचे कामे सुरु आहेत. दरम्यान कोळपणी करण्यासाठी शेतात जात असताना लोंबकळलेल्या वीजतारांना लोखंडी कोळप्याचा स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सदरची दुर्दैवी घटना जामनेर तालुक्यातील एकूलती शिवारात २० जुलैला दुपारच्या सुमारास घडली. 

जामनेर (Jamner) तालुक्यातील दोंदवाडे येथील शिवाजी गरबड पाटील (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पावसाने थोडी उघडीप दिल्याने शेती कामांना वेग आला आहे. शेतात लागवड केलेल्या कापूस, मका, उडीद, मूग पिकांची कोळपणी केली जात आहे. दरम्यान (Farmer) शिवाजी पाटील हे देखील त्यांच्या कापसाच्या शेतात कोळपणी करण्यासाठी २० जुलैला दुपारी जात होते. खांद्यावर कोळपे घेऊन शेतात जात असताना लोंबकळलेल्या विज तारांना त्यांच्या खांद्यावरील कोळप्याच्या लोखंडी दांड्याचा स्पर्श झाला. यात त्यांना विजेचा जोरदार झटका बसला. 

विजेचा धक्का (Electric Shock) बसल्याने शिवाजी पाटील हे फेकले गेले. त्यांच्या आवाज ऐकून शेतात काम करणारा  मजूर धावत आला, त्याने आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना बोलावले. यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या प्रकरणी पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. महावितरण कंपनीने वीजतारा सुव्यवस्थित कराव्यात तसेच मयत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना मदत करण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT