Hingoli News Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Hingoli News : कापसाची स्वस्त दरात करावी लागतेय विक्री; हिंगोलीत खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांची अडचण

Hingoli News : यंदा चांगला पाऊस झाला नसल्याने पीक जगविण्याची कसरत शेतकऱ्याला करावी लागली. अशा परिस्थितीत देखील कापसाचे पीक जगविले.

संदीप नागरे

हिंगोली : राज्यात कोठेही कापसाला ७ हजाराच्या वर भाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव कापूस विक्री (Cotton Price) करावी लागत आहे. यात हिंगोलीमध्ये हमी भावाने कापूस खरेदी करणारे (Hingoli) शासनाचे एकही केंद्र नाही. यामुळे शेतकरी दररोज स्वस्त दरात कापसाची विक्री करत आहे. (Maharashtra News)

यंदा चांगला पाऊस (Rain) झाला नसल्याने पीक जगविण्याची कसरत शेतकऱ्याला करावी लागली. अशा परिस्थितीत देखील कापसाचे पीक जगविले. विविध रोगांनी पिकाला ग्रासल्याने कमी झालेले उत्पादन आणि त्यात मालाला नसलेला भाव या दुहेरी संकटात कापूस उत्पादक शेतकरी अडकला आहे. मात्र हातात पैसे नसल्याने रब्बी पिकांच्या पेरणी आणि पिकाचे सगोपनासाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी (Farmer) बळीराजा कापसाची विक्री करत आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हमीभाव खरेदी केंद्र सुरु करा 

हिंगोली जिल्ह्यात कोठेही कापूस खरेदी करण्यासाठी शासकीय हमीभाव खरेदी केंद्र नाही. यामुळे शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना कापसाची विक्री करावी लागत आहे. यामुळे योग्य भाव मिळत नाही. दरम्यान शासनाने शासकीय खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT