Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price : कापसाला भाव नाही; रस्त्यावर कापूस पेटवून देत शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध

Hingoli News : मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात लाखो क्विंटल कापूस भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. त्यामुळे आज गोरेगाव परिसरात शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात संतप्त होत कापूस पेटून देत आंदोलन केले आहे.

संदीप नागरे

हिंगोली : यंदा कापसाचे उत्पादन जास्त नाही. यातच सुरवातीपासूनच शेतकऱ्याच्या कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने भाववाढीची प्रतीक्षा लागून आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. एकीकडे राज्यात सरकार स्थापन झाले असून मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. तर दुसरीकडे कापसाच्या दरात वाढ होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी नांदेडमध्ये रस्त्यावर कापूस पेटवून देत सरकारचा निषेध केला. 

महायुती सरकारचा आज नागपूरमध्ये शपथविधी सोहळा पार पडला. नेते मंत्रीपदाची शपथ घेण्यात मग्न असताना राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी मात्र अडचणी सापडला आहे. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात लाखो क्विंटल कापूस भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. त्यामुळे आज गोरेगाव परिसरात शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात संतप्त होत कापूस पेटून देत आंदोलन केले आहे. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी देखील केली होती. 

मराठवाड्यात शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेले कापूस उत्पादक शेतकरी सरकारमुळे अडचणीत सापडले आहेत. शेतात राबराब राबून उत्पादित केलेल्या कापसाला पावणे सात ते सात हजार रुपयापर्यंत भाव मिळत आहे. शेतकऱ्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून कापसाची घरातच साठवणूक केली आहे.

सरकारकडून शेतकऱ्यांना अकरा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळेल अशी आशा होती. मात्र शेतकऱ्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी मंत्रीपद आणि खाते मिळवण्यात व्यस्त असल्याने आता शेतकरी सरकारच्या विरोधात कापूस प्रश्नावरून आक्रमक होत आहेत. हिंगोलीच्या गोरेगाव परिसरातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना एकत्रित करत कापूस प्रश्नावरून आंदोलन केले आहे.

शेतकऱ्यांनी घरात साठवणूक केलेला कापूस रस्त्यावर आणून फेकून देत जाळून टाकला आहे. तर सरकारने आगामी काळात कापूस प्रश्न सोडवला नाही; तर रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा देखील या शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे. या आंदोलनामध्ये गजानन कावरखे, नामदेव पतंगे, दशरथ मुळे, गजानन जाधव, अशोक कावरखे, चंदू सावके, संदीप मानमोठे आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT