Hingoli News Saam tv
ऍग्रो वन

Hingoli News : शेतीच्या मशागतीसाठी बैलचं नाही मिळालेत; शेतकऱ्याने स्वतःलाच जुंपलं औताला, डोळे पाणवणारा VIDEO

Hingoli News : शेतात लागवड केलेल्या हळदीच्या पिकाची मशागत करण्यासाठी बैल जोडी मिळत नाही.

संदीप नागरे

हिंगोली : बैलजोडीची बाजारातील किंमत अधिक असल्याने ते घेणे अल्पभूधारक शेतकऱ्याला न परवडणारे आहे. शिवाय हातात पैसा नसल्याने भाड्याने जोडी लावून शेतीची मशागत करणे देखील न परवडणारे असल्याने दोन लहान भावांना शेतीच्या मशागतीसाठी औताला जुंपले.  

हिंगोलीच्या (Hingoli) वसमत तालुक्यातील सिरळी गावच्या शिवारात हे दृश्य पाहण्यास मिळाले आहे. शेतात लागवड केलेल्या हळदीच्या पिकाची मशागत करण्यासाठी बैल जोडी मिळत नाही. परंतु पाऊस पडण्याच्या अगोदर शेतातील काम आटोपण्यासाठी एका अल्पभूधारक शेतकऱ्यांने लहान भावाला औताला जुंपत शेतीचे काम पार पाडले आहे. बालाजी पुंडगे असे या (Farmer) शेतकऱ्याचे नाव असून हा पुंडगे परिवार सध्या शेतीची मशागत करण्यासाठी कामाला लागला आहे. 

जोडी घेणे परवडेना 

पुंडगे यांच्याकडे दीड एकर शेती आहे. शेतीसाठी (Bullock) बैल जोडी घेणे परवडत नसल्याने पुंडगे यांनी बैल खरेदी केले नव्हते. त्यातच ऐनवेळी मशागतीला बैल जोडी मिळत नसल्याने त्यांनी स्वतःच्या भावांना औताला जुंपण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दोघे औत ओढत असून बालाजी पुंडगे हे औत धरून मागे चालत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पाकिस्तानी गँगस्टर शहबाज भट्टीसोबत लिंक असल्याच्या माहितीवरून दहा तरुणांना नागपूर ATS ने घेतलं ताब्यात

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

स्मार्ट मीटर बसण्यापूर्वीच ४४० व्होल्टचा झटका; पाठवलं ५ महिन्यांचं वीजबिल, धक्कादायक प्रकरणाने राज्यात खळबळ

Shocking: नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांची आत्महत्या, चिंचेच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Eknath Shinde : शिवसेनेला खिंडार! एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का, नाराज नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

SCROLL FOR NEXT