यवतमाळ जिल्ह्यात गारांसह मुसळधार पाऊस; शेतकरी चिंतेत Saam Tv
ऍग्रो वन

यवतमाळ जिल्ह्यात गारांसह मुसळधार पाऊस; शेतकरी चिंतेत

गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या. नेर तालुक्यातील वाई हातोला, पिंपरी कलगा, आनंदनगर, टाकळी सलामी या भागात पावसा दरम्यान गारपीट झाली.

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

यवतमाळ: संध्याकाळ च्या सुमारास मुसळधार पावसाने (Heavy Rain) यवतमाळ जिल्ह्याच्या (Yawatmal District) काही भागात चांगलाच कहर केला असून अक्षरशः झोडपून काढले. यवतमाळ, आर्णी -पांढरकवडा , नेर, पुसद , या परिसरात एवढा पाऊस पडला की शेतात पाण्याचे डबके साचले. सोसाट्याच्या वाऱ्या सह आलेल्या पावसाने पांढरकवडा मार्गावरील जोडमोहा गावाजवळ रस्त्यावर मोठं मोठी झाड उन्मळून पडली. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.

गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या. नेर तालुक्यातील वाई हातोला, पिंपरी कलगा, आनंदनगर, टाकळी सलामी या भागात पावसा दरम्यान गारपीट झाली. पावसाळ्या दरम्यान शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. या अचानक आलेल्या पावसामुळे बैल पोळा सण साजरा करणाऱ्या शेतकऱ्यांची धावपळ उडाली.

दरम्यान आज बैलपोळ्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या आलेल्या पावसाने महाराष्ट्रातील बळीराजा सुखावला आहे. काही दिवसांपुर्वी हवामान खात्याने बऱ्याच जिल्ह्यांना अलर्ट जारी केला होता. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट उद्या दुपारी वाहतुकीसाठी राहणार बंद

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT