८ हजार वृक्षाचा हॅप्पी बड्डे दणक्यात झाला साजरा  विश्वभूषण लिमये
ऍग्रो वन

८ हजार वृक्षाचा हॅप्पी बड्डे दणक्यात झाला साजरा

जगभर साजरा केला जाणारा, वाढदिवस हा व्यक्तिकेंद्रित उत्सव प्रत्येकाला जवळचा वाटतो. दिवसेंदिवस वाढदिवस साजरी करण्याच्या पद्धतीमध्ये कमालीचे बदल झाल्याचे आपल्याला पहायला मिळतं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विश्वभूषण लिमये

सोलापूर : जगभर साजरा केला जाणारा, वाढदिवस Bithday हा व्यक्तिकेंद्रित उत्सव प्रत्येकाला जवळचा वाटतो. दिवसेंदिवस वाढदिवस साजरी करण्याच्या पद्धतीमध्ये कमालीचे बदल झाल्याचे आपल्याला पहायला मिळतं आहे. वाढदिवस साजरा करण्याचा नवनवीन ट्रेंड Trends प्रत्येकवर्षी पहायला मिळत आहे. Happy Bithday of 8000 trees Celebrate

हे देखील पहा-

सोलापूर Solapur जिल्ह्यातील बार्शी Barshi मधील पर्यावरणप्रेमी 'मॉर्निंग सोशल फाउंडेशन' ने त्याच्याही पुढे एक पाऊल टाकले आहे. बार्शीतील पर्यावरणप्रेमी 'मॉर्निंग सोशल फाउंडेशन' Morning Social Foundation ने तब्बल ८ हजार झाडांचा बड्डे साजरा करून नवा फंडा सुरु केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील 'मॉर्निंग सोशल फाउंडेशन' ही संस्था मागच्या ६ वर्षांपासून झाड लावण्याचे आणि जगवण्याचे काम करत आहे.

या फाउंडेशन मधील जो सदस्य मॉर्निंग वॉल्क ला गैरहजर राहतो, त्याला प्रत्येकी १५० रुपयांचा दंड Penalty आकारला जातो. यातून जमा झालेल्या, पैशातून झाडांची खरेदी केली जाते. या फाउंडेशनने याच पैशातून १ पाणी टँकर Tanker खरेदी केला आहे. या टँकरच्या माध्यमातून या झाडांना दररोज पाणी दिले जाते. प्रत्येक झाड लावत असताना अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने याची लागवड केली जाते. Happy Bithday of 8000 trees Celebrate

साजरा करण्यात आलेल्या, झाडांच्या बड्डे ला रितसर केक कापला गेला आहे. फुगे लावून झाडांना सजवण्यात आले होते. झाडांना बड्डे बॉय- गर्ल Girl प्रमाणे सुशोभित आणि झाडांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ- नीटनेटका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे वाढदिवसाची गाणी सुद्धा, यावेळी गाण्यात आली आहेत.

'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे, बार्शीला हिरवीगार करण्यासाठी 'मॉर्निंग सोशल फाउंडेशन' चे ४ ते ५ हजार कार्यकर्ते रोज झटत आहेत. दरम्यान, नवीन ५ हजार झाडांचे वृक्षारोपण ही या ग्रुपच्या सदस्यांकडून करण्यात आले आहे. बार्शीतील पर्यावरण प्रेमी तरुणांनी घेतलेल्या, या पुढाकारामुळे वृक्षसंवर्धन चळवळीला गती मिळण्यास मदत होणार आहे. Happy Bithday of 8000 trees Celebrate

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे - राज ठाकरे

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT