शेतीचा वीजपुरवठा खंडित; शेतकऱ्यांचा रात्रभर महावितरण कार्यालयात ठिय्या जयेश गावंडे
ऍग्रो वन

शेतीचा वीजपुरवठा खंडित; शेतकऱ्यांचा रात्रभर महावितरण कार्यालयात ठिय्या

महावितरणने वीज पुरवठा खंडित केल्याने रब्बीचा हंगाम धोक्यात

अॅड. जयेश गावंडे

अकोला - पातूर (patur) तालुक्यातील सस्ती येथील वीज वितरण कार्यालयांतर्गत शेतशिवारात जवळपास 35 विद्युत रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित (Electricity) करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे सिंचन प्रभावित झाल्याने रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. या विरोधात परिसरातील जवळपास शेकडो शेतकऱ्यांनी (Farmer) आक्रमक पवित्रा घेत कालपासून महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. रात्रभर शेतकऱ्यांनी आपली रात्र महावितरणच्या कार्यालयात काढली आणि ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले.

हे देखील पहा -

यावेळी वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. सस्ती शिवारात खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामापासून आशा आहे. यंदा परिसरात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात कांदा, हरभरा, गहू आदी पिकांची पेरणी केली असून, नसल्याने सद्यस्थितीत पिके बहरली आहेत. त्यामुळे मात्र पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने वीजपुरवठाची गरज आहे.

दरम्यान, येथील महावितरणने वीज पुरवठा खंडित केल्याने रब्बीचा हंगाम धोक्यात आला आहे. दरम्यान या विरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक होत. थेट महावितरणच्या कार्यालयात ठिय्या दिला आहे. रात्रभर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले दरम्यान आजही शेतकरी आंदोलनावर ठाम असल्याची माहिती आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drinking water before bed: झोपण्याआधी किती तास आधी आणि किती पाणी प्यावं? फायदे-तोटे जाणून घ्या

CBSE 12th Exam: सीबीएसईचा ७ देशांसाठी मोठा निर्णय, १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द

Khaja Recipe: सणासुदीला घरच्या घरी कुरकुरीत आणि गोड खाजा करा तयार, वाचा सोपी रेसिपी

Free Ticket : वंदे भारत-तेजस एक्सप्रेसचा मोफत तिकिटाने प्रवास, चहा-नाश्ता अन् जेवणही फुकटात, वाचा योजना नक्की आहे काय?

Celebrity Mangalsutra Designs: सेलिब्रिटींना घातलेली 5 युनिक मंगळसूत्र, या आहेत ट्रेडिंगच्या डिझाईन्स

SCROLL FOR NEXT