वाघाच्या बछड्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी... अभिजीत घोरमारे
ऍग्रो वन

वाघाच्या बछड्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी...

दबा धरून बसलेल्या वाघाने शामा सोनटक्के वर पाठिमागून हल्ला केला. दरम्यान आरडाओरड करुन काठिने हाकण्याचा प्रयत्न केल्याने बछड़ा पळून गेला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत घोरमारे

गोंदिया: शेळ्यांसाठी झाडाच्या फांदया आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाच्या बछड्याने हल्ल्या करुण गंभीर जखमी केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातिल जानाटोला जवळ घड़ली आहे. शामा सोनटक्के वय 52 वर्ष असे जखमीचे नाव आहे. वाघाच्या हल्लात गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचाराकरीता नागपुरात हलविण्यात आले.

गोरेगाव वन परिक्षेत्राधिकारी कायार्यालयातंर्गत येणाऱ्या जानाटोला गावात रहिवासी शामा सोनटक्के वय 52 वर्षे हे रविवारी सकाळी कटंगी मध्यम प्रकल्प लगत असलेल्या पिंडकेपार जंगल क्षेत्रात बक-या करीता झाडाच्या फांद्या आणण्यासाठी गेला होता.

दरम्यान, दबा धरून बसलेल्या वाघाने शामा सोनटक्के वर पाठिमागून हल्ला केला. दरम्यान आरडाओरड करुन काठिने हाकण्याचा प्रयत्न केल्याने बछड़ा पळून गेला. यात शामाच्या पाठिला गंभीर जखमा पडल्याने घायाळ झाला. या घटनेची माहिती पसरताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी वन कर्मचारी पोहचत पंचनामा करून तत्काळ शामा सोनटक्के यास उपचारासाठी सुरुवातीला गोंदिया वैद्यकीय महाविद्यालय व नंतर पुढील उपचारासाठी नागपुरला रवानगी केली. पुढील तपास वनविभागाद्वारे सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवी मुंबई महानगरपालिकेत मोठी कारवाई, उपायुक्त कैलास गायकवाड अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात

HSC, SSC Result: बारावी बोर्डाचा निकाल कधी जाहीर होणार? mahresult.nic.in वर डाउनलोड करा मार्कशीट

Earphone : जास्त हेडफोन वापरल्याने व्हाल बहिरे! कसा कराल सुरक्षित वापर

Crime: पुण्याला 'भाभी'च्या घरी जाते सांगून घराबाहेर पडली, नंतर लॉजमध्ये आढळला निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह; नेमकं काय घडलं?

Helmet Buying Tips: हेल्मेट घेताय? या 7 गोष्टी लक्षात ठेवाच

SCROLL FOR NEXT