pandharpur , malshiras , banana
pandharpur , malshiras , banana saam tv
ऍग्रो वन

Farmer : केळीला उच्चांकी दर; दहा महिन्यांत शेतक-यास २८ लाखांचा फायदा

भारत नागणे

Pandharpur : केळीचे (Banana) भाव वाढल्याने सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. माळशिरसच्या (malshiras) एका शेतक-याला केळीचा उच्चांकी दर मिळाला आहे. या शेतक-याला प्रति किलो 27 रुपये दर मिळाला आहे. हा आत्ता पर्यंतचा उच्चांकी दर मानला जात आहे. (pandharpur latest marathi news)

कोरोनाच्या दोन वर्षानंतर आखाती देशांमध्ये केळीला मागणी वाढली आहे. परिणामी केळीच्या दरात घसघसीत वाढ झाली आहे. माळशिरस तालुक्यातील नेवरे येथील शेतकरी दत्तात्रय बोबडे यांच्या केळीला प्रति किलो 27 रूपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे. केळीला आता पर्यंतचा सर्वाधिक दर मिळाला आहे.

दत्तात्रय बोबडे यांची नवरे येथे चार एकर केळीची बाग आहे. त्यातून त्यांना 120 टन केळीचे उत्पादन मिळाले. त्यांची ही केळी आखाती देशांमध्ये निर्यात झाली आहे. प्रति किलो 27 रूपये दराने त्यांनी‌ जागेवर विक्री केली. त्यातून त्यांना 32 लाखांचे उत्पन्न मिळाले.

केळी बागेसाठी त्यांना चार लाखांचा खर्च आला. हा खर्च वजा‌ करता त्यांना अवघ्या दहा महिन्यांत 28 लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे. दरम्यान केळीला उत्तम दर मिळत असल्याने तालुक्यातील अन्य शेतकरी देखील आनंदित आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Forecast: विदर्भ तापला, मराठवाड्यात उष्णतेच्या झळा; सोमवारपासून पुन्हा कोसळणार पाऊस

Brazil Flood: ब्राझीलमध्ये विनाशकारी महापूर, हजारो घरे पाण्याखाली; आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

SCROLL FOR NEXT