seeds, maval news saam tv
ऍग्रो वन

Fake seeds cost farmers heavily : शेतकरी आर्थिक गर्तेत, मावळात नामांकित कंपनीच्या नावावर भाताच्या बोगस बियांणाची विक्री

बोगस बियाणांची विक्री करण्यावर सरकार अंकुश कधी ठेवणार.

दिलीप कांबळे

Maval News : मावळात भाताच्या बोगस बियांणाची विक्री झाल्याची तक्रार शेतकरी करु लागले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. तरी दोषींवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जाेर धरु लागली आहे. (Maharashtra News)

राज्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट सुरू असतानाच सुजलाम सुफलाम असणाऱ्या भाताच्या आगारातील मावळ तालुक्यात देखील बोगस बियांण विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मावळातील कुसगाव पमा याठिकाणी संतोष तापकीर यांनी (एका नामवंत कंपनीचे) इंद्रायणी भाताचे बीज घेतले होते. मात्र आता भात लागवड होऊन त्याला फुटवे फुटायला लागल्यावर ते निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले. हाताशी आलेले पीक हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत तालुका कृषी अधिकारी दत्ता पडवळ यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क साधल्यानंतर पंचनामा करण्यात आला. परंतु 10 एकर मध्ये घेतलेल्या पिकांचे नुकसान हे केवळ बोगस बियाणांमुळे झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तर अशा बोगस बियाणे विक्री करणाऱ्या आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई न करणाऱ्या कृषी अधिकारी आणि दोषी असलेल्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

याबाबत तालुका कृषी अधिकारी यांनी मात्र बियाणे बोगस नसून वातावरणामध्ये बदल होत असल्याने पिकांवर परिणाम झाल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कमिटीने पंचनामे करून त्याचा अहवाल येणाऱ्या काही दिवसांत देणार असल्याचे सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Travel : किल्ल्यांचे विहंगम दृश्य अन् आव्हानात्मक ट्रेक, नाशिकमध्ये लपलंय 'हे' सुंदर ऐतिहासिक ठिकाण

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Municipal Elections : निवडणुका लागताच महायुतीत मिठाचा खडा, अजित पवार स्वबळावर लढणार, ठाण्यात रंगत वाढली

Bigg Boss Marathi 6 : अंकिता वालावलकरच्या नवऱ्याचं 'बिग बॉस मराठी'शी खास नातं, कोकण हार्टेड गर्लनं VIDEO शेअर करत केला खुलासा

Accident: आनंदावर विरजन! लग्नाला जाताना समृद्धी महामार्गावर कार उलटली; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू,अपघातापूर्वीचा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT