diwali holiday, holdiays for bazar samiti in nashik, onion, lasalgoan bazar samiti  saam tv
ऍग्रो वन

Bazar Samiti News : दिवाळी निमित्त उद्यापासून दहा दिवस बाजार समित्या राहणार बंद

उद्या पासून पाच दिवस धान्य भुसार मालाचे लिलाव बंद राहणार असल्याच बाजार समितीच्या सचिवांनी सांगितले.

साम न्यूज नेटवर्क

- अजय सोनवणे

Bazar Samiti News : नाशिक (Nashik) जिल्हयातील कांद्याची (onion) सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीसह (lasalgoan bazar samiti ) जिल्हयातील सर्वच बाजार समित्या उद्या पासून दिवाळी निमित्त दहा दिवस बंद राहणार आहेत. शेतक-यांसह नागरिकांनी याची नाेंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. (Nashik Latest Marathi News)

दिवाळीसाठी व्यापा-यांच्या खळ्यावरील कामगार हे सुट्टीवर गावी जातात. त्यामुळे बाजार समितीत होणारे लिलाव बंद राहतात. दरम्यान उद्यापासून जिल्हातील सर्वच चौदा बाजार समिती व उपबाजार समितींना जवळपास दहा सुट्टी राहणार आहे. त्यामुळे शेतक-यांना कांदा विक्रीसाठी आता दहा दिवस थांबावे लागणार आहे. (Maharashtra News)

लासलगाव बाजार समितीत उद्या म्हणजेच शनिवार पासून ते ३० ऑक्टोबर पर्यंत कांदा (onion) लिलाव बंद राहतील. उद्या पासून पाच दिवस धान्य भुसार मालाचे लिलाव बंद राहणार असल्याच बाजार समितीच्या सचिवांनी सांगितले. याची नाेंद नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी (farmers) व नागरिकांनी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT