Dhule News Saam tv
ऍग्रो वन

Dhule News : तुटलेल्या वीज वाहक तारेमुळे शेतकऱ्यांच्या बैलाचा मृत्यू; सुदैवाने तिघे बचावले

भूषण अहिरे

धुळे : शेतात कोळपणीचे काम सुरु असताना शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने बैलाचा मृत्यू झाला आहे. तर शेतात मशागत करणाऱ्या तीघा जणांना देखील या विजेच्या तारेचा स्पर्श झाल्यामुळे मोठा झटका बसला. मात्र बैलाच्या मृत्यूने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. 

पावसाने सध्या उघडीप दिली आहे. यामुळे शेतात वखरणी, कोळपणीचे काम सुरु आहे. या दरम्यान शिरपूर (Shirpur) तालुक्यातील खर्दे शेतशिवारात दुर्दैवी घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास शेतकरी आपल्या शेतात कोळपणी करत असताना शेतातून गेलेली विजेची तार अचानक तुटून खाली पडली होती. यात विद्युत प्रवाह सुरू असलेल्या या विजेच्या तारेला बैलाचा स्पर्श (Electric Shock) झाला. यामध्ये बैलाचा जागीच मृत्यू झाला. शेतकऱ्याच्या या नुकसानीला वीज वितरण विभागाचा गलथान कारभार जिम्मेदार असल्यामुळे वीज वितरण विभागाने शेतकऱ्याच्या या नुकसानीची दखल घेत, शेतकऱ्याला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यातर्फे करण्यात आली आहे.

सुदैवाने तिघे बचावले 

विजेची तार तुटून पडली असल्याने ती दिसून आली नाही. यामुळे कोळपणी करत असताना पुढे असलेल्या बैलाचा स्पर्श झाला. लोखंडी वखर असल्याने मागे मशागतीसाठी असलेल्या तिघांना देखील विजेचा जोरदार झटका बसला. या झटक्याने तिघे जण बाजूला फेकले गेल्यामुळे सुदैवाने त्यांचा जीव बचावला आहे.  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT