Dhule News Saam tv
ऍग्रो वन

Dhule News: वीजबिल थकल्याने ट्रान्स्फॉर्मर सुरू केले नाही; हताश कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

वीजबिल थकल्याने ट्रान्स्फॉर्मर सुरू केले नाही; हताश कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

साम टिव्ही ब्युरो

न्याहळोद (धुळे) : बँकेचे थकीत कर्ज व वीजबिलही थकल्यामुळे येथील भारत (अमोल) चैत्राम पाटील (वय २६) या तरुण शेतकऱ्याने कीटकनाशक औषध प्राशन करून शेतातच आत्महत्या केली. (Breaking Marathi News)

पाच-सहा दिवसांपासून ट्रान्स्फॉर्मर बंद असल्याने वीज वितरण कंपनीकडून सूचना देण्यात आली होती. मात्र पैसे नसल्याने ते विजेचे बिल भरू शकले नाही. कपाशी विकल्यावर भरणा करू, अशी विनंतीही त्यांनी केली. तरीही त्यांना तातडीने वीजबिल भरणा करण्यास सांगण्यात आले. त्यातच शेतातले कांदा पीक, मका उन्हाने करपू लागले होते. आधीच कर्जाचा वाढता डोंगर अन् त्यात वीज वितरण विभागाची कारवाई, यामुळे भरतचे मनोबत ढासळले व त्याने त्याच ट्रान्स्फॉर्मरजवळील कांद्याच्या शेतात आत्महत्या केली.

बी. एस्सी.पर्यंत शिक्षण झालेले भरत पाटील यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी फोटोग्राफीदेखील केली. त्यांच्या शेतशिवारातील डीपीवरील वीज कनेक्शन महावितरणने बंद केले होते. परिणामी, हाताशी आलेले पीक वाया जाण्याची शक्यता बळावली. आधीच बँकेच्या कर्जामुळे वीजबिल भरण्यास थोडा अवधी मिळावा; यासाठी त्यांनी विनंती केली होती.

दरम्यान, यापूर्वी येथील शेतकरी योगेश जाधव, प्रशांत अहिरे, बापू साखरे, मनोहर जिरे आदींनी फागणे येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊनदेखील त्यांचे ट्रान्स्फॉर्मर सुरू न झाल्याने कपाशीची विक्री झाल्यावर थकीत बिल भरणार असल्याचे भरत पाटील व संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले होते. तरीही ट्रान्स्फॉर्मर सुरू झाले नाही. दरम्यान, भरत पाटील यांच्या मागे आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संसद मार्ग पोलीस स्टेशन बाहेर राहुल गांधी यांचं आंदोलन

Shocking : नांदेड हादरलं! १० वर्षीय विर्द्यार्थिनीवर शाळेत अत्याचार; मुख्यध्यापकाने जबरदस्ती केली अन्...

Ration Card : केशरी रेशन कार्ड काढायचंय? उत्पन्न मर्यादा किती अन् काय कागदपत्र लागणार? वाचा एका क्लिकवर

Working Woman Mangalsutra Designs: वर्किंग वुमनसाठी बेस्ट 1 ग्रॅममध्ये सोन्याचे मंगळसूत्र, लेटेस्ट 5 डिझाईन्स

Ashutosh Ranka: आधी जमिनीवर पाडलं, नंतर दोरी अन् लाथाबुक्क्यांनी मारहाण; आशुतोष रांकालाही सोडलं नाही, धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT