Dhule News
Dhule News Saam tv
ऍग्रो वन

शिरपूर येथे कापसाच्या बोगस बियाणे विकणाऱ्यावर कारवाई

भूषण अहिरे

धुळे : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी राजा शेतीच्या मशागतीच्या लगबगीमध्ये गुंतलेला आहे. अशात बोगस बियाणे विकणाऱ्या एकाला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोगस बियाणांच्या जवळपास (Dhule News) अकरा पाकीटांसह ताब्यात घेतले आहे. (dhule news Action against seller of bogus cotton seeds in Shirpur)

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतकरी (Farmer) बियाणे व खतांची मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात. अशा परिस्थितीमध्ये बोगस बियाणे व खत विकणाऱ्या टोळी देखील सक्रिय होत असतात. या पार्श्वभूमीवर कृषी विभागातर्फे या बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर नियंत्रण विभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकामार्फत जिल्ह्यातील पहिली कारवाई शिरपूर (Shirpur) येथे करण्यात आली आहे.

चौदा हजाराचे बोगस बियाणे

अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या बोगस बियाणांच्या कंपनीवर तसेच ती बियांणे विकणाऱ्यावर शिरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांकडून जवळपास 13 हजार 750 रुपयांचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

SCROLL FOR NEXT