Dhule News Rain Saam tv
ऍग्रो वन

Dhule News: मध्‍यरात्रीस अवकाळी पाऊस; गहू जमीनदोस्‍त, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

मध्‍यरात्रीस अवकाळी पाऊस; गहू जमीनदोस्‍त, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

साम टिव्ही ब्युरो

धुळे : धुळे जिल्ह्यामध्ये साक्री, शिंदखेडा, शिरपूर या तालुक्यांसह धुळे तालुक्यात देखील मध्यरात्रीनंतर अवकाळी पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्याच्या (Farmer) हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, आवकाळी पावसामध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, पपई यासारख्या पिकांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. (Letest Marathi News)

हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार मध्यरात्रीनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे (Dhule News) धुळे तालुक्यातील आर्नी शिवारात कापणीला आलेला गहू अक्षरशः जमीनदोस्त झाला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. मायबाप सरकारने नुकसानीची गांभीर्याने दखल घेत लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.

धडगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस

नंदुरबार : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार धडगाव तालुक्यात आणि परिसरात मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पाऊस झाला. हलक्या स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे यात नुकसान होणार नसल्याची शक्यता आहे. मात्र ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांना काही प्रमाणावर फटका बसणार आहे. दिवसाला ४० सेल्सिअसपर्यंत तापमान गेले. मात्र दोन दिवसांपासून तापमानात बदल झाला असून ढगाळ वातावरण होत आहे. ढगाळ वातावरणामुळे मका, पपई, केळी आणि उशिरा लावलेल्या गहू, हरभरा या पिकांवर काही प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UTI In Women: महिलांना वारंवार का होतं यूरिन इंफेक्शन? डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची ४ कारणं

Pillow Hygiene: तुम्ही वापरत असलेल्या उशीर कव्हर आरोग्यासाठी ठरतात धोकादायक

MLC Election : मोठी बातमी! शिंदेसेनेच्या दिग्गज नेत्यावर गुन्हा दाखल, जिल्हाधिकारी कार्यालयात नेमकं झालं काय?

Diabetes -High BP : मधुमेहाच्या रुग्णांना हाय बीपीचाही त्रास आहे? लाइफस्टाइलमध्ये आताच करा 'हे' ५ बदल, नाहीतर...

Deool Band 2 Collection : स्वामींची कृपा! 'देऊळ बंद २'ची १०० कोटींच्या दिशेने यशस्वी घोडदौड सुरू; 'राजा शिवाजी'ला देतोय तगडी टक्कर, प्रवीण तरडेंच्या चित्रपटाने किती कमावले?

SCROLL FOR NEXT