Tomato Price Saam tv
ऍग्रो वन

Tomato Price : टोमॅटो उत्पादन अडचणीत; केवळ १२ ते १५ रुपयांचा भाव, शेतकऱ्याची खर्चासाठीही पदरमोड

Dharasahiv News : धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी परिसरातील टोमॅटो उत्पादन सध्या संकटात सापडले आहेत. सध्या पाणी टंचाई असतानाही माळरान जमीनीवर मोठ्या कष्टाने टोमॅटो पिकविला

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : एकवेळ टमाटा उत्पादक शेतकऱ्याला चांगला नफा मिळत होता. किरकोळसह मार्केटमध्ये चांगला दर मिळत होता. (dharashiv News) मात्र लागवड मोठ्या प्रमाणात होऊन आवक वाढली असल्याने टोमॅटोचे भाव कमी झाले आहेत. यामुळे उत्पादक शेतकऱ्याचा तोडणी व वाहतूक खर्च देखील निघेना झाला आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील तामलवाडी परिसरातील टोमॅटो उत्पादन सध्या संकटात सापडले आहेत. सध्या पाणी टंचाई असतानाही माळरान जमीनीवर मोठ्या कष्टाने टोमॅटो (Tomato) पिकविला आहे. उपलब्ध पाण्यावर शेतकरी (farmer) उन्हाळी फळभाज्यांची पिके घेतात. मात्र लाखो रुपयांचा खर्च करून ही भाव नसल्याने टोमॅटो उत्पादन शेतकरी हतबल झाला आहे. टोमॅटो तोडणी व वाहतूक खर्चासाठीची पदमोड करण्याची वेळ आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

तोडणी, वाहतूक खर्चही निघेना 

दरम्यान टोमॅटोला बाजारात किलोला बारा ते पंधरा रुपये दर मिळत असल्याने तोडणीसह वाहतुक खर्चासाठी देखील पदरमोड करण्याची वेळ टोमॅटो उत्पादन शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 जणांचा बळी, जीवघेण्या खड्ड्यांना जबाबदार कोण? महाराष्ट्र खड्ड्यात कुणी घातला?

Maharashtra News Live Update: बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच्या भागातील एक झाड शासकीय वाहनावर कोसळले.

मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचा पत्ता बदलणार; काय असणार नवीन पत्ता?

नवीन कपडे, मोबाईल घेऊन देतो म्हणाला अन् ..." सत्ताधारी नेत्याच्या 14 वर्षीय मुलीसोबत धक्कादायक प्रकार

कंगनानंतर रामदेव बाबांनीही तोडले तारे, रामदेव म्हणतात जेन-झींमुळे भारताची बदनामी

SCROLL FOR NEXT