Onion Price Saam tv
ऍग्रो वन

Onion Price : निर्यात बंदीचा फटका; भाव पडल्याने कांदा विक्रीस नेणेही परवडेना

Dharashiv News : कवडीमोल भाग मिळत असल्याने शेतकऱ्याची आर्थिक गणित कोलमडले असुन कांद्याला १० ते १५ रुपये भाव मिळत आहे

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागु केली आहे. या मुळे कांद्याच्या भावात घसरण सुरूच आहे. आता (Dharashiv News) काढणीला आलेल्या कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. भाव मिळत नसल्याने कांदा (Onion) विक्रीला नेणे देखील परवडत नसल्याची स्थिती आहे. (Live marathi News)

भूम तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली आहे. मात्र कांद्याला कवडीमोल भाग मिळत असल्याने शेतकऱ्याची आर्थिक गणित कोलमडले असुन कांद्याला १० ते १५ रुपये भाव मिळत आहे. परंतु त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे (Farmer) शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी गुंतवणूक करून पिकवलेल्या कांदा पिकाचा उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एकरी ६५ हजाराचा खर्च 

कांदा लागवड व जोपासण्यासाठी एकरी ६५ हजार रुपयांचा खर्च येतो. खतांचे भाव दुपटीने वाढले आहेत. तर वातावरणातील बदलामुळे फवारणी देखील सातत्याने करावी लागते त्यामुळे औषधाचा खर्चही वाढला आहे परंतु भाव पडल्याने लावलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लातूर हादरलं! मेडिकलमध्ये औषध आणायला गेलेल्या ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

Shocking : चालक आणि नर्सच्या प्रेमाचा धक्कादायक शेवट! गर्लफ्रेंडनेच कुऱ्हाडीने वार करून बॉयफ्रेंडला संपवलं

Maharashtra Live News Update: कल्याणातील रिंगरोड टप्पा ३ च्या कामाला वेग,आठ महिन्यांत पूर्णत्वाचा निर्धार

Rice Eating Tips : दुपारी की रात्री; भात खाण्याची योग्य वेळ कोणती?

Government Employees: केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे नियम केले स्पष्ट; पेन्शनसाठी होणार फायदा

SCROLL FOR NEXT