Soyabean Crop Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Crop : सोयाबीन पिकावर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादन घटण्याची शक्यता

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. अनेक भागात सोयाबीनला फुल आणि शेंगा लागण्याच्या वेळेस पावसाची संततधार सुरु असल्याने शेंगांचा लाग कमी झाला

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : यंदाच्या हंगामात सुरवातीपासून पाऊस सातत्याने सुरु राहिला. यामुळे पिकांवर यांचा परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळाले. दरम्यान आता मागील आठवड्यापासून पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली आहे. मात्र सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव पडल्याचा दिसून येत आहे. 

धाराशिव (Dharashiv News) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. अनेक भागात सोयाबीनला फुल आणि शेंगा लागण्याच्या वेळेस पावसाची संततधार सुरु असल्याने शेंगांचा लाग कमी झाला. दरम्यान आता पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे कपाशी. ज्वारी या पिकांची वाढ होण्यास चांगले वातावरण निर्माण झाले आहे. मात्र (Soyabean Crop) सोयाबीन पिकावर याचा परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. सततच्या पावसानंतर ऊन पडत असल्याने सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव पडल्याचे पाहण्यास मिळत आहे.  

उत्पादनात घट होण्याची भीती 

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरीपातील प्रमुख पिक असलेल्या सोयाबीन पिकावर तुळजापूरसह धाराशिव भागात बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होवुन सोयाबीनच्या शेंगा बियांची फुगवण न झाल्याने वाळुन गेल्या आहेत. एकीकडे सततच्या पावसामुळे नुकसान झाले असताना करपा रोगाचा प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहीले असुन शासनाने पंचनामे करुन मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांतुन केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

SCROLL FOR NEXT