Banana Export Saam tv
ऍग्रो वन

Banana Export : परांड्यातील केळी इराण-इराकला जाणार, भाव किती मिळाला?

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यामधील पाचपिंपळा येथील शेतकरी नागेश राजाराम पाटील यांनी केळीची लागवड केली होती. शेतातील परिपक्व झालेल्या केळी आता इराण व इराकमध्ये निर्यात करण्यात आली

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
 : चांगल्या दर्जाची केली पिकवत तिची निर्यात केली जात असते. अशाच प्रकारे परंडा तालुक्यातील पाचपिंपळा येथील शेतकऱ्याने उत्पादीत केलेली केळीची इराण व इराकला निर्यात केली जात आहे. या निर्यात केलेल्या केळीला २७ रुपये असा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.   

धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यामधील पाचपिंपळा येथील शेतकरी नागेश राजाराम पाटील यांनी केळीची लागवड केली होती. शेतातील परिपक्व झालेल्या केळी आता इराण व इराकमध्ये निर्यात करण्यात आली आहे. नागेश पाटील यांनी आपल्या शेतात तीन एकर क्षेत्रात मायक्रो सन या जातीच्या केळीची लागवड केली असून त्यांच्या शेतातील केळी काढायला सुरुवात झाली.  

दरम्यान या केळीची काढणी केल्यानंतर इराण- इराकमधून मागणी होत आहे. याठिकाणी केळीला २७ रुपये भाव मिळाला आहे. तीन एकर केळी बागेसाठी त्यांना अडीच लाख रुपये खर्च आला. तर यातुन त्यांना आतापर्यंत जवळपास ७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून जवळपास अजून ३ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. सध्या थंडीचे वातावरण असल्याने केळीला चिलिंगचा फटका बसल्याने चार ते पाच लाखांचा फटका बसल्याचे शेतकरी नागेश पाटील यांनी सांगितले आहे.

बारा हजार शेतकरी कृषीपंपासाठी रांगेत
यवतमाळ
: यवतमाळ जिल्ह्यात कृषी फिटरवर १८ तासाचे लोडशेडिंग होत असल्याने शेतकरी चांगलेच वैतागले आहे. यावर मात करण्यासाठी सौरकृषी पंप योग्य पर्याय मानल्या जातोय भविष्यातील विजेच्या अडचणी लक्षात घेता शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठी वीज वितरण कंपनीकडे मागणी केली. मात्र १२ हजार शेतकरी कृषी पंपासाठी रांगेत उभे आहेत. अजूनही अनेक शेतकऱ्यांना सौर पंप मिळाले नाही यामुळे सिंचन विहिरी असतानाही अनेक शेतकऱ्यांना ओलीत करताच आले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! २ लाखांपर्यंतचे कर्जमाफ; पण कुणाला मिळणार लाभ? राज्य सरकारच्या योजनेत नेमकं काय?

Weather Update : मोठी बातमी! अखेर 'तो' क्षण आला; पुढील काही तासांत मान्सून धडकणार, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain : वरुणराजाचं थाटात आगमन! मुंबई-उपनगरात काळे ढग दाटले, मुसळधार पाऊस सुरू

French Toast Recipe: सकाळी झटपट करा टेस्टी फ्रेंच टोस्ट; लहानमुलं पोटभर करतील नाश्ता

SCROLL FOR NEXT