cotton price rise in parbhani Saam tv
ऍग्रो वन

Parbhani : परभणीमध्ये कापसाच्या दरात 900 रुपयांची वाढ, साेयाबीन उत्पादकांना भाव वाढीची अपेक्षा

दर वाढतील या आशेवर शेतकऱ्यांनी सोयाबीन वेअर हाउस व घरात साठवून ठेवले आहे. सध्याचा मिळणार दरात उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक गर्तेत सापडला आहे.

राजेश काटकर

Parbhani :

परभणीच्या बाजारपेठेत काही दिवसांपासून सात हजारांच्या आत असणाऱ्या कापसाच्या भावात आता 800 ते 900 रुपये वाढ झाली आहे. यामुळे कापूस विक्रीसाठी बाजारपेठात गर्दी वाढली आहे. दरम्यान परभणी जिल्ह्यात कापसा पाठोपाठ सोयाबीनचा पेरा ही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु साेयबीनला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परभणीच्या बाजारपेठेत पंधरा दिवसांपूर्वी कापसाचे दर साडे सहा हजार ते सात हजार रुपयांपर्यंत भाव होते. मागील आठ दिवसांपासून बाजारपेठेत तेजी आल्याचे कापसाचे भाव सात हजार आठशे ते नऊशे रुपयांपर्यंत गेला आहे. येत्या काही दिवसांत असेच दर राहतील किंवा ह्यात वाढ होण्याचा अंदाज बाजारपेठातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सोयाबीनचे दर साडे हजार रुपये

परभणी जिल्ह्यात कापसा पाठोपाठ सोयाबीनचा पेरा ही मोठ्या प्रमाणात वाढलाय. यंदा सुरुवाती पासूनच पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने सोयाबीनच्या उताऱ्यात मोठी घट झाली आहे. या स्थितीत सोयाबीनला योग्य दर मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. (Maharashtra News)

सोयाबीनला साडे चार हजार रुपये दर मिळत आहे. दर वाढतील या आशेवर शेतकऱ्यांनी सोयाबीन वेअर हाउस व घरात साठवून ठेवले आहे. सध्या मिळत असलेल्या भावात उत्पादन खर्चही निघत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सौरव दास आणि रंका यांची अखेर तुरुंगातून सुटका; ८ दिवसानंतर मिळाला जामीन

Aloe Vera Gel : रखरखीत त्वचा, मुरूम... रोज चेहऱ्यावर अ‍ॅलोवेरा लावता? मग फायदे आणि नुकसान आत्ताच घ्या जाणून

Diwali Sweet Safety : दिवाळीच्या मिठाईत भेसळ तर नाही ना? 'या' ३ सोप्या ट्रिक्सने ओळखा

Walking With Music: चालताना गाणी ऐकावीत की शांतपणे चालावे? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर?

Kitchen Hacks : गॅस पेटवण्याआधी करा हे १ काम, LPG सिलेंडर चालेल १५ दिवस जास्त

SCROLL FOR NEXT