cotton price per quintal in maharashtra akot. saam tv
ऍग्रो वन

Cotton Price Per Quintal : कापसाचा दर वाढला, उत्पादकांत चैतन्य; जाणून घ्या प्रतिक्विंटलला मिळणारा भाव

आगामी काही दिवसात कापसाचे दरात आणखी वाढ हाेण्याची शक्यता आहे.

जयेश गावंडे

गत काही दिवसांपूर्वी कापसाच्या (cotton) दरात घसरण झाल्याने भाव ७ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले होते. त्यानंतर कापसाचा बाजार स्थिरावला होता. आता पुन्हा पांढऱ्या सोन्याने ९ हजारांचा टप्पा गाठला आहे. (Maharashtra News)

अकोल्यातील अकोट (akot) बाजार समितीत कापसाला ९ हजार ७० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच बाजार समितीत आवकही वाढल्याचे चित्र दिसून आले. आगामी काही दिवसात पुन्हा कापसाचे दर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कापसाचा हंगाम ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. परतीच्या पावसामुळे हंगाम लांबला आहे. दिवाळीपर्यंत (diwali) कापसाचे दर कमी होते. हंगामाच्या प्रारंभी काही दिवस कापसाचे बाजारभाव प्रतिक्विंटल ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या घरात होते.

आता पुन्हा कापसाचा (cotton) दरात किंचित वाढ झाली असून, ९ हजार रुपयांचा टप्पा कापसाने गाठला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये कापसाच्या दरात २००-३०० रुपयांची क्विंटलमागे वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड घाटात वाहतूक कोंडी

शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सामील होणार? मी तुम्हाला इतिहासात नेते म्हणत सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा

लाडक्या बायकोसाठी चांदीच्या जोडव्याचे 5 सुंदर डिझाईन्स

Nashik News: भावली धबधबा मारहाण प्रकरण, पर्यटकांना मारहाण करतानाचा नवा VIDEO समोर

Monsoon Hair Care: पावसाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? पावसाळ्यात हीच चूक ठरू शकते केस गळतीचं कारण

SCROLL FOR NEXT