Onion Export News Saam Tv
ऍग्रो वन

Onion Export News: गुजरातला 2 हजार टन पांढरा कांदा निर्यातीची परवानगी, महाराष्ट्राला का नाही? केंद्राला शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

Farmers News: केंद्र सरकारच्या गुजरातमधून पांढऱ्या कांदा निर्यातीचा नाशिकमध्ये निषेध करण्यात आला. वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळे धोरण शेतकऱ्यांसाठी घातक असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केलाय.

साम टिव्ही ब्युरो

Onion Export News:

केंद्र सरकारच्या गुजरातमधून पांढऱ्या कांदा निर्यातीचा नाशिकमध्ये निषेध करण्यात आला. वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळे धोरण शेतकऱ्यांसाठी घातक असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केलाय. कांदा निर्यातीत दुजाभाव का? असा सवाल शेतकऱ्यांनी केलाय.

कांदा निर्यातबंदीच्या प्रश्नावरुन शेतऱ्यांची ओरड असतानाच केंद्र सरकारच्या एका निर्णयावरुन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. गुजरात राज्यातील पांढऱ्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी देत वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने अधिसूचना जारी केली. त्यानुसार दोन हजार टन पांढऱ्या कांद्याची निर्यात होईल. त्यासाठी गुजरात राज्यातील मुंद्रा, पिपावाव आणि नाव्हाशेवा म्हणजेच जेएनपीटी बंदरातून ही निर्यात करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यामध्ये निर्यातदाराला गुजरात सरकारच्या फलोत्पादन आयुक्तांचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. यावरुन नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने निषेध केलाय. कोटा पद्धतीने कांद्याच्या निर्यातीला परवानगी देऊ नये सरसकट निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी केली आहे. केंद्र सरकार राज्यांमध्ये दुजाभाव का करते? असा सवाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांची विचारलाय.

लेट खरीप कांद्याचा हंगाम वेगात असताना ८ डिसेंबर 2023 पासून केंद्र सरकारने केलेल्या निर्यातबंदीमुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. आठ महिन्यात कांदा उत्पादकांचे शंभर कोटींचे नुकसान झाल्याची तक्रार आहे.

आता रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याची काढणी सुरू होऊन कांदा बाजारात येत आहे. पांढऱ्या कांद्याला अधिक दर असतानाही त्याच्या निर्यातीस परवानगी दिली. मात्र लाल व गुलाबी कांद्याला का नाही, असा सवाल निर्यातदारांनी केला आहे. ऐन निवडणुकीतही कांद्याचा प्रश्न चिघळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

SCROLL FOR NEXT