Akola Agriculture News जयेश गावंडे
ऍग्रो वन

अकोटात कोरोनाचे नियम पाळून कापूस खरेदी; कापसाला मिळतोय चांगला दर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कमीत कमी लोकांमध्ये बाजार समितीमध्ये मालाची खरेदी सुरू

जयेश गावंडे

अकोला -विदर्भातील कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचा नामोल्लेख होतो. या बाजार समितीमध्ये अकोला, बुलढाणा (Buldhana) आणि अमरावती (Amravati) जिल्ह्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली जाते. शिवाय बाजार समितीमध्ये या हंगामात महाराष्ट्रातील सर्वाधिक दर कापसाला मिळत असून येथे येणाऱ्या शेतकऱ्यांच्या (Farmer) वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. (Akola Agriculture Latest News)

त्यामुळे बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये, शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये व कापसाची खरेदी करताना व्यापारी व शेतकऱ्यामध्ये पूरेसे अंतर राखले जावे या उद्देशाने अकोट बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आणलेली वाहने अंतर राखत ऊभी केली जात आहेत. शेतकऱ्यांना मास्क लावण्याचे आवाहन केलें जाते व व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या वाहनाजवळ जाऊन कपाशीची खरेदी करतात यामुळे शेतकरी हमाल व व्यापारीमधे पुरेसे अंतर राखल्या जात असल्याने कोरोनाचा धोका कमी झाला आहे.

हे देखील पहा -

कोरोनाची कुणालाही लागण होऊ नये या उद्देशाने वाहनांमध्ये अंतर आखले जात आहे. यासाठी बाजार समितीमध्ये वाहने उभी करण्यासाठी लाईन आखण्यात आली असून प्रत्येक ट्रॅक्टर जवळ थेट व्यापारी पोहोचून शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करीत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कमीत कमी लोकांमध्ये बाजार समितीमध्ये मालाची खरेदी सुरू असून आतापर्यंत कोणालाही कोरोनाची बाधा झाली नाही. बाजार समिती बंद ठेवण्याची कधीही वेळ आली नाही अशी माहिती बाजार समितीचे मुख्य प्रशासक गजानन पुंडकर यांनी दिली.

शेतकऱ्यांची येणारी वाहन बाजार समितीमध्ये येतानाच लाईन नुसार उभी केल्याचे निर्देश दिले जातात. त्यामुळे प्रत्येक वाहनांमध्ये 10 ते 12 फुटाचे अंतर ठेवले जात असून कपाशी खरेदीच्या वेळी सुद्धा अंतर राखूनच खरेदी केली जाते. त्यामुळे व्यापारी व शेतकऱ्यांचा धोका 50 टक्के कमी झाला असून बाजार समितीत विक्रमी खरेदी होत आहे यामुळे शेतकरी व व्यापारी समाधानी असून प्रशासक मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

कपाशीची खरेदीही सुरू राहावे बाजारपेठा बंद पडू नये व बाजार समितीत येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांची ही काळजी घेता यावे या उद्देशाने अकोट बाजार समितीच्या प्रशासक मंडळाने केलेला हा प्रयोग यशस्वी होत असून सर्व बाजार समित्यांनी खरेदी विक्री साठी बाजार समितीत येणाऱ्या वाहनांना पुरेसे अंतर राखून जागेवरच शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी केली तर निश्चितच कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी हे फायद्याचे ठरेल.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT