Buldhana News Saam tv
ऍग्रो वन

Buldhana News: कर्जबाजारीला कंटाळून प्रयोगशील शेतकऱ्याने संपविले जीवन

कर्जबाजारीला कंटाळून प्रयोगशील शेतकऱ्याने संपविले जीवन

संजय जाधव

बुलढाणा : शेगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच प्रयोगशील (Farmer) शेतकरी पुंडलिक पारस्कार (वय ४९) यांची शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेगाव (Shegaon) तालुक्यातील पहुरजीरा येथे ही दुर्देवी घटना घडली. (Latest Marathi News)

गेल्या काही वर्षांपासून शेती ही सातत्याने तोट्यात जात असून नापिकी व बँका तसेच खासगी कर्जामुळे पुंडलिक पारस्कार हे त्रस्‍त होते. त्यामुळे नैराश्यात गेल्याने त्यांनी पहुरजीरा येथील शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती कळताच गावकरी व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी घाव घेतली. पारस्कार यांच्या पश्च्यात आई, पत्नी, तीन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

काही काळ राहिले उपसभापती

काहीकाळ त्यांनी शेगाव पंचायत समितीचे उपसभापती म्हणूनही काम पाहिले होते. अत्यंत मनमिळावू स्वभाव व कष्टाळू शेतकरी म्हणूनही ते सर्वदूर परिचित होते. त्यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबीयास तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: सूनेने सासऱ्याचा प्रायव्हेट पार्ट ठेचला; गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू, कशावरून इतका टोकाचा वाद झाला?

Firecracker Blast : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

Bribe Case : नवी मुंबईत खळबळ; महापालिका मुख्यालयातच उपायुक्ताला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

NalaSopara Tourism : 'नालासोपारा'जवळील ५ विरंगुळ्याची ठिकाणे, वीकेंडला करा लहान मुलांसोबत धमाल

'तुझी फिगर झिरो, गुढी पाडव्याला साडी खेचली, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य, TCS धर्मांतर प्रकरणातील पीडितेचा हादरवणारा जबाब

SCROLL FOR NEXT