Lambi virus Saam Tv
ऍग्रो वन

बुलढाणा जिल्ह्यात लम्पि स्किनचा धोका वाढला; तीन जनावरे मृत्युमुखी

बुलढाणा जिल्ह्यात लम्पि स्किनचा धोका वाढला; तीन जनावरे मृत्युमुखी

संजय जाधव

बुलढाणा : पाळीव जनावरांसाठी घातक समजल्या जाणाऱ्या 'लम्पि स्किन (Lampi Virus) आजाराचा जिल्ह्यातील धोका वाढला आहे. आजअखेर या आजाराने ३ जनावरांचे बळी घेतले असून बाधित (Buldhana News) जनावरांची संख्या शतकापल्याड गेली आहे. (Buldhana News)

शेगाव (Shegaon) तालुक्यातुन शिरकाव करणाऱ्या या आजाराची आज ११ सप्टेंबर अखेर १६१ जनावरांना बाधा झाली आहे. यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पशुधन धारक शेतकरी (Farmer) भयभीत झाले आहे. शेगाव, देऊळगाव राजा, जळगाव जामोद, मलकापूर, मोताळा, सिंदखेड राजा या तालुक्यात प्रादुर्भाव जास्त झाल्याची माहिती सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन) यांनी दिली.

लसीचा तुटवडा

दरम्यान प्रतिबंधक लसीचा तुटवडा असल्याचे डॉक्टर पाटील यांनी सांगितले. हा नियमित आजार नसून लसीचे उत्पादन मागणीनुसार करण्यात येते. त्यामुळे तुटवडा असल्याचे सांगून आजअखेर दीड लाख लसींची मागणी करण्यात आली आहे. पशूंची आंतर जिल्हा, तालुका व राज्य वाहतूक बंद करण्यात आल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

बाजार केले बंद

तसेच खामगाव, देऊळगाव राजा, दुधा (बुलडाणा), आसलगाव (जळगाव), मलकापूर आदी ठिकाणचे गुरांचे बाजार बंद करण्यात आले आहे. तसेच उपलब्ध असलेल्या लसीचा डोस सिंदखेड लपालि या गावातील गुरांना देण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

राज्यातील सर्व शाळांच्या परिसरात HFSS अन्नपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT