Buldhana News Saam tv
ऍग्रो वन

Buldhana News : तूर उत्पादनात प्रचंड घट; उत्पादन खर्चही निघणे कठीण

Buldhana News : यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कापूस पिकांना फटका बसला. तर ढगाळ वातावरणामुळे आणि धुके पडल्याने तुर उत्पादनात झालेला खर्चही निघणे कठीण

संजय जाधव

बुलढाणा : सातत्याने येत असलेल्या अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. या दरम्यान तुरीच्या (Buldhana) उत्पादनात देखील मोठी घाट झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात सध्या तुर सोगंणी तसेच काढणीला सुरुवात झाली. यात अपेक्षेपेक्षा उत्पादन कमी येत आहे. (Live Marathi News)

यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे (Soyabean) सोयाबीन, कापूस पिकांना फटका बसला. तर ढगाळ वातावरणामुळे आणि धुके पडल्याने तुर उत्पादनात झालेला खर्चही निघणे कठीण असून शेतकरी (Farmer) हवालदिल झाल्याचे चित्र आहे. सुरुवातीला झालेला मुसळधार पाऊस आणि  नंतर अज्ञात व्हायरसमुळे उभे तूर पीक परिपक्व होण्याआधीच सुकल्याने तुरीच्या उताऱ्यात ५० टक्क्यांहून अधिक घट येत आहे. तर तुरीचा दाना देखील बारीक पडल्याचे दिसून येत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तूर पेरणीनंतर तिचा मशागत म्हणून कोळपणी, फवारणी, कापणी आणि काढणी यासाठी लागलेला खर्च या उत्पादनातून निघालेला नाही. उत्पन्नात झालेली घट बघता शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. शिवाय बाजारात दर ही कमी मिळतं असल्याने दुहेरी संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT