Buldhana News Saam tv
ऍग्रो वन

Buldhana News : पोलिसांकडून ४ लाखाची रक्कम जप्त; आडत्यांकडून खरेदी विक्री बंद, शेतकऱ्यांचा महामार्गावर चक्का जाम

Buldhana News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणला आहे

संजय जाधव

बुलढाणा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. यात वाहन तपासणी केली जात असून या वाहन तपासणीदरम्यान चार लाखाची रक्कम आढळून आल्याने पोलिसांनी हि रक्कम जप्त केली. मात्र सदरची रक्कम आडत्यांची असल्याने त्यांनी रोष व्यक्त करत बाजार समितीमधील खरेदी विक्री बंद केली. यामुळे शेतकऱ्यांनी महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Buldhana News) जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणला आहे. त्यांना पैसे देण्यासाठी कल्याणी ट्रेडर्सच्या मालकाने एक्सीस बँकेतून ४ लाख रुपये बाजार समितीमध्ये काढून घेऊन जात होते. याच वेळी मलकापूर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान केलेल्या वाहन तपासणीत सदरची रोख रक्कम जप्त केली आहे. त्यामुळे अडतं व्यापाऱ्यांनी (Bajar Samiti) कृषी उत्पन्न बाजार समितीतील खरेदी बंद केली आहे.

शेतकरी उतरले रस्त्यावर  

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडत्याचे पैसे पोलिसांनी पकडल्या कारणाने बाजार समितीतील खरेदी विक्री बंद आहे. दरम्यान याच कारणामुळे बेलाड येथील असंख्य (Farmer) शेतकऱ्यांनी मुंबई- कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर चक्का जाम आंदोलन केले. परिणामी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या चक्काजाममुळे वाहनातील प्रवासी त्रस्त  झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची आज नागपुरात महत्त्वपूर्ण बैठक

Pune News: होर्मुझमध्ये इराणकडून जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला, पुण्याच्या इंजिनिअरचा मृत्यू

Malvan Fort : मालवणमधील ऐतिहासिक रत्न! अरबी समुद्रावर नजर ठेवणारा 'हा' किल्ला आजही दिमाखात आहे उभा

अवघ्या २० मिनिटांत बनवा मऊसूत ओट्स इडली; घरच्या घरी करा 'ही' सोपी रेसिपी

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर

SCROLL FOR NEXT