Sangli, farmers,  saam tv
ऍग्रो वन

Sangli News : भेंडीचा दर गडगडला, हताश शेतकऱ्यानं पिकात साेडली मेंढरं; व्यापा-यांवर आराेप

Bhendi Price Slashed : फायदा साेडाच शेतीसाठी केलेला खर्च देखील निघणार नव्हता त्यामुळे शेतकरी हताश झाला.

विजय पाटील

Sangli News : सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येथील भगवान देवकर या शेतकऱ्याने पस्तीस गुंठे क्षेत्रामध्ये महागडी औषधे फवारणी आणि लागवडी करून साठ हजार रुपये खर्चून भेंडी पीक घेतले होते. मात्र सध्या भेंडीला दर नसल्याने पोटच्या पोरांसारखे सांभाळलेल्या पिक काढून टाकण्याची वेळ सध्या शेतकऱ्यावर आली आहे.  (Maharashtra News)

या शेतक-याला 35 गुंठे क्षेत्रात दोन ते तीन लाखाचे उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. मात्र भेंडीला (vegetables) प्रति किलो 7 रुपये ते 15 रुपया पर्यंत किलोला दर मिळत असल्याने लागवडीचा खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतक-याने भेंडी शेतात मेंढरं सोडली.

सध्या रासायनिक लागवडीचे दर गगनाला भिडले असल्याने शेती करणे शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर भेंडीला प्रति किलो 7 रुपये ते 15 रुपया पर्यंत किलोला दर मिळत आहे. यामध्ये दलाली 10 टक्के वाहतूक आणि नगास 25 रुपये हमाली 4 रुपये तोलाई याप्रमाणे मिळालेल्या दरातून शेतकऱ्याला पदरात काही पडत नव्हते. उलट स्वतः पदरमोड करावी लागत आहे.

सध्या ग्रामीण शहरी बाजारात 40 ते 60 रुपये किलो प्रमाणे भेंडीचा दर आहे. व्यापारी व घाऊक व्यापारी हे दोघे मिळून शेतकऱ्यांना (farmers) फसवत असल्याचे चित्र आहे. त्याबाबत शेतकऱ्याने बोलून दाखवले आहे. आज देवकर यांनी भरात आलेले भेंडी पिकात मेंढरं सोडून पीक काढून टाकले. यामुळे देवकर यांना तीन लाखाचे नुकसान सोसावे लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Flood: गडचिरोलीत पावसाचा कहर; २५ प्रमुख रस्ते आणि महामार्ग वाहतुकीसाठी बंद

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

SCROLL FOR NEXT