Solar Pump Saam tv
ऍग्रो वन

Solar Pump : शेकडो शेतकरी कृषिपंपाच्या प्रतीक्षेत; पंप मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी वर्षभरापूर्वी भरली १० टक्के रक्कम

Bhandara news : केंद्राद्वारे पंतप्रधान कुसुम व महाराष्ट्र सरकारद्वारे मुख्यमंत्री कृषी सौरपंप योजना राबविली जाते. या योजनेचा लाभ देखील अनेक शेतकऱ्यांना मिळाला आहे. काही शेतकरी प्रतीक्षेत आहेत

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणारी वीज हि रात्रीच्या सुमारास व १२ तास मिळत असते. यामुळे शेतकऱ्यांना रात्री- अपरात्री शेतात जावे लागत असते. मात्र चोवीस तास पिकांना पाणी देता यावे; यासाठी सोलर कृषी पंप योजना सुरु केली आहे. मात्र लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांना कृषिपंपांची प्रतीक्षा कायम आहे.  

शेतीला मुबलक पाणी मिळेल, असे मध्यम तसेच लघु सिंचन प्रकल्प नसल्याने लाखनी तालुक्यातील शेतकरी बोरवेल व विहिरीच्या उपसा पाण्यावर अवलंबून आहेत. ग्रामीण भागात महावितरणद्वारे शेतीला चोवीस तास वीज पुरवठा करता यावा. यासाठी केंद्राद्वारे पंतप्रधान कुसुम व महाराष्ट्र सरकारद्वारे मुख्यमंत्री कृषी सौरपंप योजना राबविली जाते. या योजनेचा लाभ देखील अनेक शेतकऱ्यांना मिळाला आहे. परंतु काही शेतकरी प्रतीक्षेत आहेत. 

दरम्यान वर्षभरापासून अर्ज करूनही शेतकऱ्यांना कृषिपंपाचा लाभ मिळाला नाही. दिवसेंदिवस विजेची वाढती मागणी पाहता सरकारने वीज उत्पादनाचे वेगवेगळे पर्याय शोधले आहेत. सध्या सौरऊर्जेच्या वापरावर भर देण्यात येत आहे. सौर उर्जेचे महत्त्व लक्षात घेता मागेल त्याला कृषिपंप देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु लाखनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागणी करूनही पंप मिळालेले नाही.  

दहा टक्के रक्कम भरली 

लाखनी तालुक्यात शेतकऱ्यांनी सोलर कृषी पंपासाठी अर्ज केले होते. योजनेसाठी त्यांचे नावे देखील निश्चित झाले होते. मात्र कृषिपंप मिळवण्यासाठी मंजूर लाभार्थ्यांनी एका वर्षांपूर्वी १० टक्के रक्कम भरली. मात्र, त्यांना कृषिपंपाची प्रतीक्षा असून विद्युत महावितरण विभागाच्या चकरा माराव्या लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT