Bhandara News Saam tv
ऍग्रो वन

Bhandara News : शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; भंडारा जिल्ह्यात पावसाने फिरवली पाठ

Bhandara News : सद्या पावसाळा लागला असुन शेतकरी शेतीच्या कामाला लागला आहे. राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केलेली पिके डोलू लागली

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : राज्यात यंदा जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनचे आगमन झाले. सुरवातीला बऱ्यापैकी पाऊस पडला मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवली आहे. आता जुलै महिना सुरू झाला असला तरी भंडारा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट उभे आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागून आहेत. 

सद्या पावसाळा लागला असुन शेतकरी (Farmer) शेतीच्या कामाला लागला आहे. राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केलेली पिके डोलू लागली आहेत. मात्र. काही भागात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यात भंडारा (Bhandara) जिल्ह्याचा समावेश आहे. जून महिन्यात भंडारा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. या पावसात शेतकरी धानाचे परे टाकले. पण आता जुलै महीना लागला असुन पावसाने हुलकावणी दिली आहे. यामुळे जमिनीतून निघत असलेले पिकांचे कोम आता कोमेजू लागले आहेत. त्यांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. 

दुबार पेरणीचे संकट 

मोठ्या मेहनतीने शेतकऱ्यांनी धानाचे परे टाकले. नियमित (Rain) पाऊस येईल व धान शेती लागवड होणार अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र सध्यातरी जिल्ह्यात दिसत आहे. यामुळे शेतकरी आकाशाकडे डोळे लावुन आहे. भंडारा जिल्ह्यात पाऊस पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची वेळ आली आहे. पावसाच्या लहरी पणाचा फटका आता शेतकऱ्यांनी बसणार आहे. यामुळे पाऊस लवकर पडावा यासाठी शेतकऱ्यांकडून देवाला साकडे घातले जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT