Unseasonal Rain Saam tv
ऍग्रो वन

Unseasonal Rain : अवकाळीच्या माऱ्याने मका जमीनदोस्त; वादळी वार्‍याने तोंडचा घास हिरावला

Bhandara News : खरीप हंगामात शेतकऱ्याला फारसे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे रब्बी व उन्हाळी पीक घेण्यावर शेतकऱ्याचा भर आहे. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी मका लागवड केली आहे.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : जिल्ह्यात उन्हाळी धान पिकाला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणत रब्बी हंगामात मक्याची लागवड केली आहे. (Bhandara) मात्र शनिवारी रात्री गारपिटीसह वादळी पावसाने मका पीक उकळून जमीनदोस्त झाला आहे. या पुन्हा आलेल्या अवकाळीचा संकटाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. (Tajya Batmya)

खरीप हंगामात शेतकऱ्याला (farmer) फारसे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे (Rabi crops) रब्बी व उन्हाळी पीक घेण्यावर शेतकऱ्याचा भर आहे. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी मका लागवड केली आहे. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात उन्हाळी धान पिकाला फाटा देत मक्याचा पेरा वाढलेला आहे.  मात्र शनिवारी रात्री अचानक आलेल्या गारपिटीसह वादळाने कणीस भरलेले मक्याचे पीक उखडून जमीनदोस्त झाल्याचे चित्र भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील जेवनाळा परिसरात बघायला मिळत आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकरी हवालदील 

साधारण नोव्हेंबर महिन्यात लागवड केलेल्या मका पिकावर शेतकऱ्यांनी उत्तम नियोजन करत चांगला खर्चही केला. त्यामुळे पीकही जोमदार आले. सध्या मक्याच्या कणसाला दाणे भरण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे शेतकरी खुश होते. मात्र अचानक अवकाळी पावसाने गारपीट व वादळ वादळी वारा आल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकरी मेटाकुटीस आला असून शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. पिकावर केलेला खर्च व होणारे उत्पन्न बुडाल्याने मका उत्पादक हवालदील झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटलांची वैद्यकीय पथकाकडून तपासणी

Ayurveda Benefits : सर्दी-खोकला झटक्यात नाहीसा, डिप्रेशनवरही मात;जाणून घ्या 'या' आयुर्वेदिक वनस्पतींचे फायदे

Thursday Horoscope : गुरुवारी या 4 राशींचं नशीब चमकणार! पैशांसह करिअरमध्येही मिळणार मोठी खुशखबर; वाचा राशीभविष्य

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

SCROLL FOR NEXT