Beed News Saam tv
ऍग्रो वन

Beed News : खड्यात बांधलेल्या बैलजोडीची चोरी; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

Majalgaon News : बीड जिल्ह्यातील तालखेड गावात हा प्रकार घडला आहे. शेतकरी यशवंत कुलकर्णी हे नेहमी बाधत असलेल्या ठिकाणी दोन्ही बैल बांधले होते. रात्री चार टाकून ते घरी आले होते

विनोद जिरे

बीड : बीडच्या माजलगाव तालुक्यातील तालखेड गावातील शेतकरी (Farmer) यशवंत कुलकर्णी यांच्या खड्यावरून अज्ञात चोरट्यांनी बैलजोडी चोरून नेली आहे. सकाळी चारा टाकण्यासाठी शेतकरी उठला असता बैलजोडी नसल्याचे दिसून आले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर  दाखल आहे. (Latest Marathi News)

बीड जिल्ह्यातील तालखेड गावात हा प्रकार घडला आहे. शेतकरी यशवंत कुलकर्णी हे नेहमी बाधत असलेल्या ठिकाणी दोन्ही बैल (Bullock) बांधले होते. रात्री चार टाकून ते घरी आले होते. दरम्यान ७ जानेवारीला रात्री ८ घरी आल्यानंतर हा प्रकार घडला आहे. ८ जानेवारीला सकाळी चारा टाकायला गेले असता ही घटना समोर आली.. त्यांनी आजूबाजूच्या भागात पाहणी केली असता बैलजोडी आढळून आली नाही. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कुलकर्णी यांच्या आखाड्यावर असणारे पांढऱ्या रंगाचे गोल शिंगे असलेला १ बैल व काळ्या रंगाचा व त्याच्या कपाळावर पांढरा ठिपका असलेला १ बैल असे ६० हजार रुपये किमतीचे दोन बैल चोरून नेले आहेत. दरम्यान याप्रकरणी गुलाब उत्तमराव मोरे यांच्या फिर्यादीवरून बीडच्या माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

हायप्रोफाईल सोसायटीत खळबळजनक घटना! दिग्गज IAS अधिकाऱ्याचा संशयास्पद अंत, पोलिसांना सापडलं पत्र

Rain Update : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, २१ राज्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

मनोज जरांगेंना शह देण्यासाठी SEBCचा मुद्दा? जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

Old Monk Rum Controversy: ओल्ड मॉन्क आता रम नाही? FSSAI म्हणते हे तर 'रम-फ्लेवर्ड स्पिरिट्स'

SCROLL FOR NEXT