Onion Price Saam tv
ऍग्रो वन

Onion Price : कांद्याला मिळतोय ४५ रुपये प्रति किलो दर; बीडच्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक

Beed news : बीडच्या आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहेत. मागील १५ दिवसांखाली झालेल्या पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला

विनोद जिरे

बीड : खरिपाच्या हंगामात लागवड करण्यात आलेल्या कांद्याची काढणी करण्यात आल्याने शेतकरी कांदा विक्रीसाठी मार्केटमध्ये आणू लागला आहे. बीडच्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. दरम्यान बाजार समितीत कांद्याला ४५ रुपये इतका दर मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत दिलासा मिळाला आहे.

बीडच्या आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहेत. मागील १५ दिवसांखाली (Onion Price) झालेल्या पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. परंतु कांद्याची योग्य साठवणूक करून बाजार समितीत चांगला दर मिळाल्यानंतर शेतकऱ्यांकडून बाजार समितीमध्ये कांदा आणला जातो आहे. आष्टी तालुक्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bajar Samiti) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कांद्याची मोठी आवक होत आहे. 

दरम्यान पहिल्याच दिवशी कांद्याचा लिलाव झाला असता सरासरी ४५ रुपये प्रतिकिलो इतका दर मिळाला आहे. कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याची निर्यात दुबई, दिल्ली, तामिळनाडू, आंध्रप्रदेश यासह परराज्यात सुरू आहे. यंदा पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले असून उत्पदनात घट झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. मात्र कांद्याला सध्या चांगला दर मिळत असल्याने शेतकरी सुखावला आहे. खरीप पिकांचे काही प्रमाणत नुकसान झाले असताना कांद्याने मात्र शेतकऱ्यांना आधार दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT