Beed News Saam tv
ऍग्रो वन

Beed News : कांद्याचे पैसे मागायला गेलेल्या शेतकऱ्याला व्यापाऱ्याकडून मारहाण; बीडच्या खरडगव्हाण येथील घटना

Beed News : खडरडगव्हाण येथील शेतकरी संतोष पोपट वाडेकर व विष्णू सुभाष वाडेकर यांनी एक वर्षापूर्वी गावातील कांदा व्यापारी प्रल्हाद केरु नरवडे यांना आपला कांदा दिला होता

विनोद जिरे

बीड : कांदा काढणी झाल्यानंतर शेतकऱ्याने व्यापाऱ्याला कांदा विक्री केला होता. हा कांदा विक्रीचे पैसे व्यापाऱ्याकडून घेणे होतें. विक्री केलेल्या कांद्याचे पैसे मागायला गेलेल्या शेतकरी संतोष वाडेकर यांना गावातील कांदा व्यापाऱ्याकडून मारहाण केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडल्याचं समोर आलं आहे. 

बीडच्या (Beed News) आष्टी तालुक्यात असणाऱ्या खरडगव्हाण येथे हा संतापजनक प्रकार घडलाय. आष्टी (Ashti) तालुक्यातील खडरडगव्हाण येथील शेतकरी संतोष पोपट वाडेकर व विष्णू सुभाष वाडेकर यांनी एक वर्षापूर्वी गावातील कांदा व्यापारी प्रल्हाद केरु नरवडे यांना आपला कांदा दिला होता. व्यापारी प्रल्हाद नरवडे यांनी काही पैसे दिले. मात्र अद्याप ४१ हजार रुपये बाकी आहेत. ते पैसे मागण्यासाठी (Farmer) शेतकरी संतोष पोपट वाडेकर व विष्णू सुभाष वाडेकर हे त्यांच्या घरी गेले आसता त्यांनाच मारहाण केली गेली. त्यानंतर आपल्या पोलीस नातेवाईकांच्या मदतीने शेतकऱ्यांवरच गुन्हा दाखल केला. 

शेतकऱ्याला अश्रू अनावर 

या प्रकारामुळे शेतकरी भयभित झाले असून सरकारने आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा; अशी मागणी शेतकरी संतोष वाडेकर, विष्णू वाडेकरसह महिला शेतकऱ्याने केली आहे. आपली व्यथा सांगताना महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. दरम्यान पीडित शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून व्यापाऱ्यासह सहा जणांवर अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? विरोधकांचा वारंवार उच्चार, थेट उत्तर देत एकनाथ शिंदेंनी विषय संपवला

पुण्यात लवकरच 'डबल डेकर ट्विन टनल'; येरवडा ते कात्रजदरम्यान होणार उभारणी, कसा आहे संपूर्ण प्रकल्प?

Vidhan Parishad Election: महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला; भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना कोणाला किती मिळाल्या जागा?

Mishti Doi Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा गोड, मलाईदार मिष्टी दोई

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये बसचालकाने दोन वाहनांना दिली जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT