Soybean Crop Saam tv
ऍग्रो वन

Soybean Crop: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवसंकट; पिवळा मोझॅक विषाणूचा प्रादुर्भाव

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवसंकट; पिवळा मोझॅक विषाणूचा प्रादुर्भाव

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर आणखी एक नव संकट उभे ठाकले आहे. शंकी गोगलगायनंतर आता पिवळा मोझॅक या विषाणूचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्यामुळे सोयाबीन (Soybean) पिकाची पाने पिवळी पडत असून वाळून चालले आहे. (Beed News Farmer Soybean Crop)

बीड (Beed) जिल्ह्यात यावर्षी सोयाबीनची विक्रमी लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात तब्बल 3 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरा करण्यात आला आहे. बीड (Beed News) तालुक्यातील नेकनुर शिवारात काही ठिकाणी सोयाबीनवर हा रोग दिसून आला असून सोयाबीनसह मूग, उडीद या पिकांनाही या विषाणूचा धोका निर्माण झाला आहे.

उत्‍पादनात घट होण्याची शक्यता

सोयाबीन पिकावर शंकी गोगलगायीच्या संकटातून सावरणाऱ्या शेतकऱ्याची (Farmer) पिवळा मोझॅक या विषाणूने चिंता वाढवली आहे. या विषाणूमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी तज्ञांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसामुळे धुळे शहरातून वाहणारी पांझरा नदीला आला पूर

Donut Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा एगलेस टेस्टी चॉकलेट डोनट्स; वाचा सोपी रेसिपी

भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणी काँग्रेसच्या दिग्गज नेत्याला जमीन मंजूर

Rain Alert: पुढील २४ तास मुसळधार पावसाचे, पुणे- नाशिकसह ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Late Night Cravings: रात्री अचानक तुम्हालाही लागते का भूक? या गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं

SCROLL FOR NEXT