Beed News Saam tv
ऍग्रो वन

Beed News : शेतकऱ्यांना दिलासा..अवकाळीतील नुकसानग्रस्तांना ७ कोटी, बीड जिल्ह्यातील साडेआठ हजार शेतकऱ्यांना लाभ

Beed News : या वर्षात म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.

विनोद जिरे

बीड : एप्रिल व मे या दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानीची मदत मिळणार असून बीड जिल्ह्यातील अवकाळी पीडित शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. दोन महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त ८ हजार ४७६ शेतकऱ्यांना आता ६ कोटी ९९ लाख रुपये मिळणार आहेत.

या वर्षात म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला होता. या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. अवकाळी पावसानंतर महसूल व कृषी विभागाने पंचनामे केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने राज्य शासनास नुकसानी संदर्भाने निधीची मागणी केली होती. शिवाय शेतकऱ्यांना (Farmer) देखील या नुकसान भरपाईची प्रतीक्षा होती. परंतु शासनाकडून आता हा मदत निधी देण्यास मंजुरी देण्यात आली असून शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळाला आहे.  

खात्यात जमा होणार रक्कम 

राज्य शासनाने एप्रिल व मे या दोन महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी (Beed) बीड जिल्ह्यातील ८ हजार ४७६ शेतकऱ्यांना ६ कोटी ९९ लाख रुपये देण्यास मंजुरी दिली आहे. सदरील रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे..यामुळं आता ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT