Beed Krushi Mahotsav 2023 saam tv
ऍग्रो वन

Beed Krushi Mahotsav 2023 : असा असेल उद्यापासून सुरु हाेणारा बीड कृषी महोत्सव

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.

विनोद जिरे

Beed Krushi Mahotsav 2023 : बीड (beed) शहरात तब्बल पाच वर्षानंतर कृषी महोत्सवाचे आयाेजन करण्यात आले आहे. या कृषी महाेत्सवाच सुमारे दाेन विविध प्रकारचे स्टॉल असणार आहेत. हा महाेत्सव शेतकऱ्यांसाठी (farmers) एक पर्वणी ठरले असा विश्वास आयाेजकांनी व्यक्त केला. दरमयान या महाेत्सवात उत्तम कार्य केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे.

या महाेत्सवाबाबत साम टिव्हीशी बोलताना जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर म्हणाले उद्यापासून (ता. 24 फेब्रुवारी) 28 फेब्रुवारीपर्यंत कृषी महोत्सवाचे आयाेजन करण्यात आले आहे. या महाेत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. या कृषी महोत्सवामध्ये 200 विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात येणार आहे. तर केवळ स्टॉलचं नाही, तर उत्तम काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान देखील होणार असून पालकमंत्री अतुल सावे हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत असेही जेजुरकर यांनी नमूद केले. (Maharashtra News)

विविध कार्यशाळा, परिसंवाद, काव्य मैफिली, संमेलन अशा विविध अंगाने हे कृषी महोत्सव होत असून जे आधुनिक तंत्रज्ञान आहे, ते ठिबक, तुषार हे शेतकऱ्यांना समक्ष पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मेळावा, खरेदीदार विक्रेता संमेलन, खाद्य महोत्सव, शेती निगडीत औजारे खरेदी-विक्री दालन, पाळीव पशुधन प्रदर्शन असेल असेही जेजुरकर यांनी नमूद केले.

याबराेबरच लहान मुलांसाठी फनफेअर, कृषी उत्पादने, हस्तकला भव्य प्रदर्शन यासह प्रबोधनात्मक शॉर्ट फिल्म देखील दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही पर्वणी असणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Health : रात्री झोपेत मुलगा वारंवार बेड ओला करतो? पालकांनो, रागवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या 'ही' ५ मोठी कारणे

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरांटो प्रकल्पाविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक

Monday Horoscope : या 7 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; वाचा सोमवारचं राशीभविष्य

CM थलपती विजय यांच्यानंतर आणखी एक अभिनेता येणार राजकारणात; चर्चांना उधाण

Makeup Tips: इंडियन स्किन टोननुसार मेकअप कसा निवडावा? फाउंडेशनपासून ब्लशपर्यंत जाणून घ्या ७ सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT