Baramati News Saam tv
ऍग्रो वन

Baramati News : शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत संपविले जीवन; व्हिडीओ करत सांगितले खरे कारण

Baramati News : सणस यांच्या रानामध्ये परिसरातील शेतकऱ्यांनी विनापरवाना विद्युत धारक विद्युत पंप बसवलेले आहेत. हे पंप त्या शेतकऱ्यांना सणस यांनी काढायला सांगितले. सणस यांचे रान मोकळे केले

मंगेश कचरे

बारामती : बारामती तालुक्यातील लाटे गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील एका शेतकऱ्याने आत्महत्या (Baramati) केली असून पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग आणि पोलिसांना कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या करत असल्याचे आत्महत्या करण्यापूर्वी या (Farmer) शेतकऱ्याने केलेल्या व्हिडिओतून सांगितले आहे. यामुळे गावात खडबड उडाली आहे. (Latest Marathi News)

हनुमंत सणस असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. बारामती तालुक्यातील लाटेमध्ये क्षेत्र सणस यांचे शेत आहे. सणस यांच्या रानामध्ये परिसरातील शेतकऱ्यांनी विनापरवाना विद्युत धारक विद्युत पंप बसवलेले आहेत. हे पंप त्या शेतकऱ्यांना सणस यांनी काढायला सांगितले. सणस यांचे रान मोकळे केले. त्यानंतर हनुमंत सणस आणि त्याचा भाऊ रानामध्ये जेसीबी घेऊन साफसफाई करण्यासाठी गेले असताना त्यांना दमदाटी केली. तसेच खोट्या केस करू अशी धमकी देखील काही लोकांनी दिली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकरणानंतर वारंवार पोलीस (Police) स्टेशनमधून हनुमंत सणस आणि त्यांच्या भावाला फोन येऊ लागले. यामुळे घाबरून हनुमंत सणस यांनी आत्महत्या केली आहे असे जयवंत सणस यांनी सांगितले आहे. दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी शेतकऱ्याने व्हिडिओ तयार करून त्यामध्ये सर्व हाकिकत सांगितली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल वायरल होत आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT