Aurangabad News Farmer Saam tv
ऍग्रो वन

Aurangabad News: पुन्हा एका शेतकऱ्याने संपविले जीवन; आठवड्यातली चौथी आत्महत्या

पुन्हा एका शेतकऱ्याने संपविले जीवन; आठवड्यातली चौथी आत्महत्या

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडीया

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्‍ह्यातील शेतकरी आत्‍महत्‍या थांबत नाही. आता सलग दुसऱ्या दिवशी आत्‍महत्‍या झाल्‍याचे समोर आले आहे. सिल्लोड तालुक्यातील बोदवड (Bodwad) येथील २८ वर्षीय नंदू भिमराव लाठे या तरुण (farmer) शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून आपली जीवनयात्रा संपवली. (Letest Marathi News)

शेतात कामाला जातो असे सांगून नंदू लाठे शेतात गेला. नित्याप्रणामे तो जेवणासाठी घरी आला नसल्याने गावालगत असलेल्या शेतात नातेवाईकांनी शोधाशोध केली. यावेळी त्यांना नंदू हा शेतात बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला. त्यानंतर उपचारासाठी आधी सिल्लोड आणि नंतर (Aurangabad) छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारा दरम्यान या तरुण शेतकऱ्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

आत्महत्येचे सत्र सुरूच

कृषिमंत्री अब्‍दूल सत्‍तार यांच्‍या मतदारसंघात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. या आठवडाभरात चौथी शेतकरी आत्‍महत्‍या आहे. दरम्‍यान काल देखील एका बळीराजाने गळफास घेत आत्‍महत्‍या केली होती. यानंतर आत पुन्‍हा एका शेतकरीने आत्‍महत्‍या केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT