Amravati Rain Saam tv
ऍग्रो वन

Amravati Rain : अमरावती जिल्ह्यात हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली; पिकांचे मोठे नुकसान

Amravati News : अमरावती जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : अमरावती जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे आता हजारो हेक्टर शेतजमिनी पाण्याखाली गेली आहे. शेतातील पिके दोन ते तीन फूट पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान होत असल्याने यंदा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे.

अमरावती (Amravati) जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे. दरम्यान अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात तर कपाशी, तूर व सोयाबीन पिकाच्या शेतात दोन ते तीन फूट पाणी साचलं असून शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. संपूर्ण पिके हे पाण्याने खराब झालेली आहे. यामुळे शेतकरी (farmer) हवालदिल झाला आहे. शेतात पीक लागवड व त्यासाठी खत देणे यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. मात्र उत्पादनातून खर्च निघेल कि नाही याबाबत शंका आहे. 

खासदारांकडून नुकसानीची पाहणी 

दरम्यान दर्यापूरमध्ये नुकसान झालेल्या शेतात अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी जाऊन पाहणी करत नुकसानीचा आढावा घेतला आहे. तर ओला दुष्काळ जाहीर करावा व तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी सरकारकडे केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT